प्रतिनिधी: अवधुत सावंत
कल्याण : गेल्या चार-पाच दिवसापासून नवीन वर्षाचा स्वागतासाठी पोलीस विभाग ऍक्शन मोडवर येत सतर्कता बाळगत असून नशेखोर यांच्यावर कठोर कारवाईचे पाऊल उचलले आहे. त्या अनुषंगाने कल्याण उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांचा मार्गदर्शनाखाली कल्याण डोंबिवली हद्दीत रेस्टॉरंट आणि बार वर दारू पिऊन गाडी चालवू नये व तो कायदेशीर गुन्हा असल्याची पोस्टर लावून जनजागृती केली. या जनजागृती मध्ये कल्याण उपप्रादेशिक परिवहन मोटर वाहन चे निरीक्षक रोहित पवार, विजय नरवडे, निलेश अहिरे, प्रियंका सागांवकर आणि वाहन चालक यशवंतराव, चौरे, जगताप यांनी संध्याकाळी ठिकठिकाणी नाकाबंदी दरम्यान ‘ड्रिंक ऍन्ड ड्राईव्ह’ ची कारवाई केली.
आज ३१ डिसेंबर नवीन वर्ष साजरा करताना लोकांनी दारू पिऊन गाडी चालवू नये, तसेच वाहतुकीचे सर्व नियम पाळावे असे आवाहन कल्याण उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांनी केले आहे तसेच वाहनचालकांना त्यांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.