प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण दि २४: कल्याण पोलीस आयुक्त ठाणे शहर यांच्या आदेशाने बांगलादेशी नागरीकांवर कारवाईची मोहिम परिमंडळ-३ कल्याण चे उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण हद्दीत सुरु असुन त्या अनुषंगाने १) मानपाडा पोलीस स्टेशन हद्दीत टाटा नाका, देशमुख होम्स् जवळ, गांधीनगर झोपडपटटी, कल्याण (पुर्व) व २) महात्मा फुले चौक पोलीस ठाणे हद्दीत कल्याण (पश्चिम) रेल्वे परिसर या ठिकाणी बांगलादेशी नागरीक कोणत्याही कागदपत्राशिवाय व भारत सरकारने विहीत केलेल्या मार्गाव्यतिरीक्त घुसखोरीच्या मार्गाने भारतात प्रवेश करुन बेकायदा वास्तव्यास असल्याबाबतची गोपनीय माहिती मिळाल्याने मानपाडा व महात्मा फुले चौक पोलीसांनी स्वतंत्र पथके तयार करुन सदर दोन्ही ठिकाणी धाडी टाकुन पडताळणी केली असता एकुण ५ बांगलादेशी नागरिक विनापरवाना भारतात राहत असल्याने त्यांना कारवाई कामी अटक करण्यात आली आहे.

त्यानंतर त्यांची चौकशी करुन त्यांचेपैकी १) ४ बांगलादेशी नागरीकांवर मानपाडा पो.स्टे. गुन्हा रजि. नंबर ९१/२०२५ पारपत्र अधिनियम १९२० चे कलम ३,४, परकिय नागरीकांचा कायदा १९४६ चे कलम १३, १४ अ (ब) प्रमाणे व २) १ बांगलादेशी महिला नागरीकांवर महात्मा फुले चौक पो.स्टे.गुन्हा रजि. नंबर ७८/२०२५ पारपत्र अधिनियम १९२० चे कलम ३,४, परकिय नागरीकांचा कायदा १९४६ चे कलम १३,१४ अ (ब) प्रमाणे गुन्हे दाखल करुन पुढील तपास चालू आहे.