जोगेश्वरी (पूर्व): रस्ता सुरक्षा सप्ताह २०२५ च्या उपक्रमाअंतर्गत मुंबई पोलीस वाहतूक विभाग (जोगेश्वरी पूर्व) आणि ॲलर्ट सिटीजन फोरम, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर दिनांक १८ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ९.३० वाजता सुरू होऊन दुपारी २ वाजेपर्यंत चालणार आहे.

शिबिरामध्ये डोळे तपासणी, दंत तपासणी, छाती तपासणी, ब्लड शुगर तपासणी तसेच हाडांचे तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे. या शिबिरात सहभागी होऊन मोफत तपासणीचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

ठिकाण: जोगेश्वरी पूर्व वाहतूक पोलीस विभाग
संपर्क: 9833638989

आरोग्याची काळजी घेण्याबरोबरच रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या अनुषंगाने जनजागृती करण्यासाठी या उपक्रमाचे महत्व अधोरेखित होत आहे. त्यामुळे नागरिकांनी या सामजिक सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.