

प्रतिनिधी: अवधुत सावंत
कल्याण : दिनांक २०/०३/२०२५ रोजी श्रीमती रंजना चंद्रकात पाटेकर (वय: ६० वर्षे), राहणार. सिद्धीविनायक चाळ, खापरीपाडा, अटाळी, आंबिवली कल्याण (पश्चिम) यांचा राहते घरी अज्ञात मारेकरी याने जबरी चोरी करून श्रीमती रंजना पाटेकर या वृध्द महिलेचा खुन केल्याबाबत वृद्ध महिलेचा भाचा श्री. हर्षल प्रेमाचंद पाटकर यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून खडकपाडा पो.स्टे. गु.रजि.नं. २५३/२०२५ भारतीय न्याय संहीता १०३(१) ३११ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याच्या तपासात आरोपी बाबत काहीएक धागा दोरा नसताना तपास पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यानी शिताफीने माहिती काढून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला आरोपी नामे चांद उर्फ अकबर महम्मद शेख, (वय; ३० वर्षे), राहणार. संतोषी माता नगर, नवनाथ कॉलनी, रूम न. १० आंविवली, कल्याण (पश्चिम) यांस मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे ताब्यात घेवुन आरोपी नामे चांद उर्फ अकबर शेख याच्याकडे शिताफीने व सखोल तपास करून सदर गुन्ह्यातील जबरी चोरी झालेला मुद्देमाल १,०५,०००/- रूपये किंमतीचा हस्तगत करून आरोपीस सदर गुन्ह्यात अटक करून कौशल्यपूर्ण पध्दतीने गुन्हा उपडकीस आणलेला आहे.
गुन्ह्याच्या तपासात आरोपी नामे चांद उर्फ अकबर महम्मद शेख हा घटनास्थळाचे परिसरात राहण्यास असुन आरोपीस मोमोज विक्रीचा व्यवसाय सुरू करण्यासाठी पैसे हवे असल्याने त्याने जबरी चोरी करण्याच्या उद्देशाने मयताचे घराची काही दिवसापासून रेकी करून घटनेच्या वेळी मयत श्रीमती रंजना पाटकर ह्या घरात एकटयाच असताना आरोपी याने मयत यांच्याकडे पिण्याचे पाणी मागितले, मयत पाणी आणण्यासाठी आत गेल्या असतां आरोपी याने फिर्यादीच्या घरात प्रवेश करून हॉलमधील टिव्हीचा आवाज वाढविला, तदनंतर मयत ह्यांनी आरडा ओरडा करू नये म्हणून हाताने तोंड दाबुन जमीनीवर आपटून, गळा दाबुन जिवे ठार मारले, त्यानंतर मयताच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र, व कानातील सोन्याची कर्नफुले असा एकुण १,०५,०००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जबरी चोरी केला होता.
अटक आरोपी नामे चांद उर्फ अकबर महम्मद शेख यास यापुर्वी कोळशेवाडी पो स्टे. गु.रजि.नं. १२२/२०१४ भा.दं.वि.सं.कलम ३०२,२०१,४६०,३४ मध्ये आधारवाडी कारागृहात बंदी होता. आठ महिन्यापूर्वी सदर आरोपी हा कारागृहातून बाहेर येवुन मानेगांव अटाळी, कल्याण (पश्चिम) येथे राहण्यास होता. तदनंतर त्याने सदरचा गुन्हा केला असुन त्यास सदर जबरी चोरीसह खुनाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली असुन सध्या तो खडकपाडा पोलीस ठाण्याच्या पोलीस कोठडी मध्ये आहे.
सदर गुन्ह्यात अज्ञात मारेकरी यांचा कोणत्याही प्रकारचा धागा दोरा नसतांना खडकपाडा पोलीस ठाण्यातील तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी मा. पोलीस आयुक्त श्री. आशुतोश डुंबरे, मा. पोलीस सह आयुक्त, श्री. ज्ञानेश्वर चव्हाण, मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, श्री. संजय जाधव, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-३. कल्याण श्री. अतुल झेंडे, मा. सहायक पोलीस आयुक्त कल्याण विभाग श्री. कल्याणजी घेटे यांनी तपासकामी मार्गदर्शक सुचना दिल्या होत्या. गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक गुन्हे श्री. संदीप शिवले नेम. खडकपाडा पोलीस ठाणे करीत आहेत. सदरची कामगिरी खडकपाडा पोलीस ठाणे तपास पथकातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अमरनाथ वाघमोडे, पोलीस निरीक्षक गुन्हे संदीप शिवले. सपोनि. विजय गायकवाड, अनिल गायकवाड, पोउपनिरी. अर्जुन दांडेगावकर, सेपोउपनि. सुधीर पाटील, पोहवा. राजु लोखंडे, योगेश बुधकर, कुंदन भामरे, संदीप भोईर, विनोद कामडी, किरण शिर्के, संजय चव्हाण, ज्योती देसले, पोशि. ललीत शिंदे, महेश बगाड, राहुल शिंदे, अविनाश पाटील, अनंता देसले, सुरज खंडाळे, मनोहर भोईर, धनराज तरे यांनी यशस्वीपणे केली आहे.