प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : कोळसेवाडी वाहतूक शाखेचे वतीने वाहतूक सल्लागार समितीच्या झालेल्या या बैठकीत सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण वाहतूक विभाग संजय साबळे, निरीक्षक सचिन सांडभोर आणि विद्यानिकेतन शाळेचे मुख्याध्यापक विवेक पंडित व वाहतूक समितीच्या सल्लागार सदस्या समाजसेविका सुप्रिया कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण-शीळ रोड वाहतूक कोंडी आणि रस्त्या कडेच्या खड्ड्यांची दुरावस्था संदर्भात मेट्रो प्रकल्पाचे अधिकारी, महापालिकेचे ‘ड’ प्रभागाचे सहाय्यक आयुक्त उमेश यमगर, ‘इ’ प्रभाग बांधकाम विभागाचे उपअभियंता राजेश वसईकर, आर एस पी अधिकारी यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर पावसाळ्यामध्ये होणारी वाहतूक कोंडी कशाप्रकारे सोडवण्यात येईल व नागरिकांच्या तक्रारीचे निवारण कशाप्रकारे करता येईल या सर्व गोष्टींची चर्चा समितीद्वारे झालेल्या बैठकीत करण्यात आली.