
प्रतिनिधी: अवधूत सावंत
डोंबिवली – मानपाडा पोलीस ठाणे डोंबिवली यांच्या गोपनीय बातमीदाराकडून त्यांना मिळालेल्या माहीतीनुसार दिनांक ०७/०७/२०२५ रोजी रात्री १०:५० वाजता निळजे गांव येथील तलावाजवळील सार्वजनिक रोडवर छापा टाकून सदर ठिकाणी मिळून आलेल्या आरोपीकडून एकुण १.५१ किलो मेफेड्रॉन (एमडी) ज्याची बाजारभाव किंमत अंदाजे २.१२ कोटी रकमेपेक्षा अधिक किंमतीचा अंमली पदार्थ जप्त करून गु.र.नं ७८७/२०२५ गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ मी कलम ८ (क), २१(क) २२(क) मध्ये त्यास अटक केलेली आहे. सदरचा आफ्रिकन देशातील परदेशीय नागरीक आरोपी नामे इसा बकायोका (वय: ३७ वर्षे) मुळ राहणार आयवोरी कोस्ट याच्याकडून एकूण १.५१ किलो मेफेड्रॉन (एमडी) अंमली पदार्थ जप्त करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
यापुर्वी दिनाक २७/०६/२०२५ रोजी गु.र.नं ७३१/२०२५ गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनीव्यावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८ (क), २१(क) २२(क) अन्वये मानपाडा पोलीस ठाणे हद्दीत सव्वा दोन कोटी रूपयांचे मेफेड्रॉन (एमडी) पकडण्यात आलेले होते. त्याअनुषंगाने नवी मुंबई परिसरात आरोपीचा शोध येत असताना वरील माहीती मिळाल्याने यशस्वी कारवाई करण्यात आलेली आहे. तसेच यापूर्वी दाखल केलेल्या गु.र.नं ७३१/२०२५ मधील मुख्य आरोपी फरहान उर्फ मोहम्मद राहीब सलीम शेख याच्या कडुन बँगलोर येथील चोरीची गाडी एम.डी सह ताब्यात घेण्यात आलेली आहे.
नागरीकांना आवाहन करण्यात येते की, अंमली पदार्थांच्या विक्रीबाबत काही गोपनीय माहीती असल्यास अंमली पदार्थ विरोधी कक्ष, कल्याण तसेचं मानपाडा पोलीस ठाणे यांच्या दुरध्वनी कमांक (०२५१)२४७०१०४ यावर संपर्क साधावा. माहीती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.
सदरची यशस्वी कामगिरी ही ठाणे पोलीस आयुक्त श्री. आशुतोष डुंबरे, पोलीस सहआयुक्त श्री. ज्ञानेश्वर चव्हाण, मा.अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभागाचे श्री. संजय जाधव, पोलीस उपायुक्त परिमंडळ-३ कल्याणचे श्री. अतुल झेंडे, मा. सहायक पोलीस आयुक्त डोबिवली विभागाचे श्री. सुहास हेमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संदीपान शिंदे, पोलीस निरीक्षक (प्रशासन) श्री. दत्तात्रय गुंड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. राम चोपडे, सपोनि सागर चव्हाण, अजय कुंभार, पोहवा. पाटील, माळी, राठोड, पोशी. आडे, गरुड, झांझुर्णे, चौधर यांच्या पथकाने केलेली आहे.