प्रतिनिधी: अवधूत सावंत

उल्हासनगर – गुन्हे शाखा, घटक-४, उल्हासनगर यांनी दिवसा घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीस अटक करून त्याच्या कडुन मुद्देमाल हस्तगत करून दाखल गुन्हे उघड केलेल्या उल्लेखनिय कामगिरी केली असून त्यांची प्रशंसा होतं आहे.

ठाणे पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात बदलापुर पोलीस ठाण्याचे हद्दीत दिनांक ०१/०७/२०२५ रोजी घरफोडी चोरीचा गुन्हा दाखल होता. सदर गुह्याचा तपास गुन्हे शाखा घटक-४ कार्यालयाकडुन करण्यात येत असतांना पोहवा. गणेश गावडे यांना तांत्रिक तपासाच्या आधारे व त्यांचे गुप्त बातमीदाराकडून बदलापूर पश्चिम पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं. २५४/२०२५ बी.एन.एस. २०२३ चे कलम ३३१(३), ३०५ प्रमाणे दाखल गुन्ह्यातील संशयीत आरोपी नामे रोशन बाळा जाधव हा बंद असलेल्या ‘अमर डाय कंपनी’ जवळ उल्हास नदीकडे जाणाऱ्या रस्त्यावर उल्हासनगर-१ येथे फिरत असल्याची माहिती प्राप्त झाली. त्या अनुषंगाने उल्हासनगर क्राईम ब्रांच युनिट-४ चे पोलीस अधिकारी व पथकाने कारवाई करून आरोपी रोशन बाळा जाधव (वय: ३४ वर्षे), राहणार हनुमान मंदिर जवळ, निळजेगाव, कल्याण फाटा, डोंबिवली पुर्व, जि. ठाणे यास ताब्यात घेतले व बदलापुर पो.स्टे. गुन्हा रजि.नं. २५४/२०२५ बीएनएस २०२३ चे कलम ३३१(३), ३०५ प्रमाणे दाखल गुन्ह्यात अटक केली. त्याचेकडून घरफोडी चोरीच्या गुन्ह्यामधील सोन्या, चांदीचे दागिणे, दोन लॅपटॉप, दोन मोबाईल, तसेच रोख रक्कम हस्तगत करण्यात आली असुन खालील नमुद प्रमाणे घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.

१) बदलापुर पश्चिम पो.स्टे.गु.र.नं. २५४/२०२५ बीएनएस २०२३ चे कलम ३३१(३), ३०५ प्रमाणे

२) बदलापूर पूर्व पो.स्टे.गु.र.नं. ३९१/२०२५ बीएनएस २०२३ चे कलम ३३१ (३),३०५ प्रमाणे३) बदलापूर पुर्व पो.स्टे.गु. रजि.नं.३५७/२०२५ बीएनएस २०२३ चे कलम ३३१(३), ३३१(४), ३०५ प्रमाणे

३) बदलापूर पुर्व पो.स्टे.गु. रजि.नं.३५७/२०२५ बीएनएस २०२३ चे कलम ३३१(३), ३३१(४), ३०५ प्रमाणे

४) बदलापूर पूर्व पो.स्टे.गु. रजि.नं.३७०/२०२५ बीएनएस २०२३ चे कलम ३३१(३), ३३१(४), ३०५ प्रमाणे

५) बदलापूर पूर्व पो.स्टे.गु. रजि.नं.२२९/२०२५ बीएनएस २०२३ चे कलम ३३१(४), ३०५, ६२, ३(५) प्रमाणे

६) बदलापूर पुर्व पो.स्टे.गु.रजि.नं.३७१/२०२५ बीएनएस २०२३ चे कलम ३३१(१), ३०५ प्रमाणे

७) बदलापूर पुर्व पो.स्टे.गु.रजि. नं.३०७/२०२५ बीएनएस २०२३ चे कलम ३३१(३), ३०५ प्रमाणे

८) शिवाजीनगर पो.स्टे.गु.रजि.नं. ४७८/२०२५ बीएनएस २०२३ चे कलम ३३१(३), ३०५(ए) प्रमाणे

तरी गुन्हे शाखा घटक-४ उल्हासनगर यांनी परिमंडळ-४, उल्हासनगर यांच्या हद्दीत वेगवेगळ्या पोलीस स्टेशन मध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यांपैकी एकूण ०८ गुन्हे आरोपी रोशन बाळा जाधव यास अटक करून उघडकीस आणले आहेत. सदर गुन्ह्यामध्ये अटक आरोपीने चोरी केलेले १८९.१७ ग्रॅम वजनाचे १५,१३,३६०/- रू. किंमतीचे सोन्याचे दागिने व १०,०००/- रू. किंमतीचे चांदीचे दागिणे, ८०,०००/- रू. किंमतीचे दोन लॅपटॉप, ५०,०००/- रू. किंमतीचे दोन मोबाईल फोन आणि गुन्हयात चोरीस गेलेल्या रक्कमेपैकी ३,२८,०००/- रू. रोख रक्कम असा एकुण १९,८१,३६०/- रू. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंजाबराव उगले, मा. पोलीस उप आयुक्त, अमरसिंह जाधव, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त (शोध-१) शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी, सपोनि. श्रीरंग गोसावी, पोहवा. गणेश गावडे, राजेंद्र थोरवे, योगेश वाघ, चंद्रकांत सावंत, रितेश वंजारी, मंगेश जाधव, पोना. कुसूम शिंदे, विक्रम जाधव, पोशि. संजय शेरमाळे, अशोक थोरवे, प्रसाद तोंडलीकर, रेवणनाथ शेकडे, रामदास उगले नेमणूक गुन्हे शाखा, घटक-४, उल्हासनगर यांनी यशस्वीपणे केलेली आहे.