भक्ति दवे


➡️ इंस्टाग्राम रिल्स बघुन ट्रेडिंगच्या नावाखाली फसवणुक केलेली रक्कम तक्रादार यांना परत मिळवुन देण्यात दहिसर पोलीस ठाणेची उत्कृश्ठ कामगिरी….
➡️ घटनेची थोडक्यात हकिकत अषी कि, तक्रदार नामे रिना कांतीलाल नायडु, वय – 26 वर्षे, धंदा- नोकरी, रा.ठी. डी एम डी 4, ताडदेव तुलषीवाडी, मुबई सेंट्रल. मुंबई. 400034 मो.क्र. यांना दि. 03/10/2023 रोजी इन्टाग्राम अॅपवर व्हिडीओ बघताना एक व्हिडीओ दिसला. त्यामध्ये व्हिडीओला लाईक केल्यावर तक्रारदार यांना रिवॉर्ड मिळेल असे दिसले. सदर लिंक वर क्लिक केले असता तक्रारदार यांना डायरेक्ट त्यांच्या व्हॉटसअप वर संदेष आला. त्यामध्ये तक्रारदार यांना सांगण्यात आले कि, त्यांनी दिलेले व्हिडीओ लाईक केल्यावर तक्रारदार यांना प्रति व्हिडीओ रू. 50/- मिळतील. असे तीन व्हिडीओ लाइक केल्यावर मला रू. 150/- मिळाले. त्यानंतर त्यांनी पुढील टास्क पुर्ण करण्यासाठी टेलीग्राम अॅप डाऊनलोड करण्यास सांगीतले. सदर अॅप डाऊनलोड केल्यानंतर तक्रारदार यांना एक ‘सुपर गु्रप (8885)’ हया ग्रुपमध्ये अॅड केले. सदर ग्रुपमध्ये @govind-zc हया टेलीग्राम आयडीवरून 1 ते 20 टास्क दररोज पाठवायचे व पर टास्क 50 रू. असे होते. त्यानंतर प्रिपेड टास्क देण्यात आले ज्यामध्ये रू. 1000/- पे केल्यानंतर तक्रारदार यांना रू. 1300/- मिळाले. त्यानंतर रू. 2000/- पे केल्यावर रू. 4800/- मिळाले. त्यानंतर पुढच्या टास्कला त्यांनी तक्रारदार यांना रू. 5000/- भरण्यास सांगीतले.   त्यानंतर सदरची रक्कम ही वाढत गेली व पुढील टास्क पुर्ण केल्याषिवाय रिफंड मिळणार नाही असे सांगीतले. सदर गु्रपमध्ये आणखी काही सदस्य पैसे भरल्याचे फोटो टाकत होते त्यामुळे तक्रारदार यांचा विष्वास बसला. असे करत तक्रारदार यांनी अॅक्सिस बॅंक खाते क्र. 919010067400018 यावरून मी रू. 5000/- हे गुगल पे वरून त्यांनी दिलेले युपीआय आयडी क्र. ankitdawer542@axl यावर ट्रान्सफर केले. त्यानंतर रू. 22,000/- गुगल पे वरून त्यांनी दिलेले युपीआय आयडी क्र 259216586996@indb000012.ifsc.npci यावर ट्रान्सफर केले, त्यानंतर रू. 45,000/- हे गुगल पे वरून त्यांनी दिलेले युपीआय आयडी क्र Im.259680116369@indus यावर ट्रान्सफर केले. त्यानंतर रू. 20,000/- हे गुगल पे वरून त्यांनी दिलेल्या पंजाब नॅषनल बॅक खाते क्र. 6905000100043002 यावरती ट्रान्सफर केले. त्यानंतर रू. 45,000/- हे आयएमपीएस व्दारे पंजाब नॅषनल बॅक खाते क्र. 6905000100043002 यावरती ट्रान्सफर केले. त्यानंतर रू. 58,680/- गुगल पे वरून त्यांनी दिलेले युपीआय आयडी क्र. eazypay.581001054@icici यावरती ट्रान्सफर केले. सदर रक्कम परत मिळण्यासाठी तक्रारदार यांनी विचारणा केली असता तक्रारदार यांच्या काही चुका दाखवुन तक्रारदार यांना अजुन रू. 58,680/- पाठवा मग तुम्हाला तुमची सर्व रक्कम मिळेल असे सांगीतले. त्यावरून तक्रारदार यांच्या लक्षात आले कि, माझी एकुण रू. 1,95,680/- ची आर्थिक फसवणुक झाली आहे.सदर प्रकार लक्षात घेता तक्रारदार यांना त्यांची रू. 1,95,680/- ची आर्थिक फसवणुक झाल्याचे समजले. तक्रारदार तात्काळ दहिसर पोलीस ठाणे येथील सायबर सेल येथे हजर होताच पोउनि राजेश गुहाडे यांचेकडे तक्रार केली असता तक्रारदार यांच्या गेलेली रक्कम चा शोध घेऊन तक्रारदार यांची रक्कम ही डीबीएस बॅकेमध्ये रू. 70,000/-, इंडस्टंड बॅकमध्ये रू.45,000/-, एचडीएफसी बॅकेमध्ये रू. 22,000/- स्टेट बॅकेमध्ये रू.5034/-, रू.5034/-, रू.1000/-, रू.900/-, रू.671/- व पेटीएम मध्ये रू.3748/- असे येथे गेल्याचे समजले त्यानुसार पोउनि गुहाडे यांनी सदर बँकेच्या नोडलशी प्रथमतः कॉलद्वारे व नंतर मेल द्वारे संपर्क करून सदर अकाउंट फ्रिज करण्याबाबत सांगितले व फॉलोअप घेऊन तक्रारदार यांची आर्थिक फसवणूक झालेले रुपये 01,95,980/- मधील रूपये 01,24,991/- तक्रारदार यांना परत मिळवून देण्यात यश आले आहे. सदर कामगिरी स्मिता पाटील, पोलीस उप आयुक्त परिमंडळ 12, किशोर गायके सहाय्यक पोलीस आयुक्त, दहिसर विभाग, अविनाश पवार वरिष्ठ पोलीस निरीक्षक, दहिसर पोलीस ठाणे, यांच्या मार्गदर्शनाने सायबर अधिकारी राजेश गुहाडे, पोलीस उपनिरीक्षक, पोषि नितीन चव्हाण व मपोशी सुप्रिया कुराडे सायबर सेल यांनी सदर रकमेचे तांत्रिक विश्लेषण करून शोध घेऊन तक्रारदार यांना त्यांची आर्थिक फसवणूक झालेली रक्कम परत केली आहे.

➡️ ऑनलाईन फसवणुक झालेली रक्कम रू. 01,95,980/-
➡️ परत मिळवुण दिलेली रक्कम रू. 01,24,991/-
➡️ सायबर पथक -ः
पोउनि राजेश गुहाडे
पोशी नितीन चव्हाण
मपोशी सुप्रिया कुराडे

वरिश्ठ पोलीस निरीक्षक,
दहिसर पोलीस ठाणे, मुंबई.