सलाहुद्दीन शेख

दि. ०४/०१/२५

अंधेरी पोलीस ठाणेकडुन जबरीने मोबाईल स्नॅचिंग करणाऱ्या आरोपींना अटक करून त्यांच्याकडुन किं.अं ९,१८,३००/- रूपये किंमतीचे एकुण १२० मोबाईल हस्तगत करण्यात आले.

फिर्यादी यांनी अंधेरी पोलीस ठाणे मुंबई येथे समक्ष येउन कळविण्यात आले आहे की, दि. ३१/१२/२४ रोजी १४.५० वाचे सुमारास त्या प्रसादम हॉटेल समोरून, आगरकर चौक, सहार रोड, अंधेरी पूर्व मुंबई येथुन मोबाईलवर बोलत जबरीने चालत जात असताना दोन मोटारसायकलवरिल अनोळखी इसमांनी त्यांचा मोबाईल खेचुन घेउन गेल्याची तक्रार दिल्याने त्यांचे तक्रारीवरून अंधेरी पोलीस ठाणे येथे गु.र.क ०२/२५ कलम ३०९(२) (४), ३(५) बीएनएस अन्वये नोंद करण्यात आला आहे.

मा. वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली वर नमुद दाखल गुन्हयाचा तपास पोउपनि किशोर परकाळे व पथक यांनी केला. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तांत्रिक व कौशल्यपुर्ण तपास करून दोन आरोपीतांस मालपाडोंगरी, अंधेरी पुर्व, मुंबई येथुन ताब्यात घेउन त्यांना अटक करण्यात आली. अटक आरोपींकडे केलेल्या तपासात त्यांनी अंधेरी पोलीस ठाणे हद्दीतील रवि वाघेला नावाच्या इसमास मोबाईल दिला असल्याचे सांगितले. रवि वाघेला याचा शोध घेउन त्यास नमुद गुन्हयात अटक करण्यात आली. त्याचेकडुन एकुण ९,१८,३००/- रूपये किंमतीचे १२० विविध कंपनीचे मोबाईल हे हस्तगत करण्यात आले आहेत.

अटक आरोपीतांचे नाव व पत्ता

१) प्रसाद सिताराम गुरव वय ३१ वर्षे रा.ठी अंधेरी पुर्व, मुंबई ९३.

२) विकेश ओमप्रकाश उपाध्याय वय २७ वर्षे रा.ठी ,हंजरनगर, अंधेरी पुर्व, मुंबई

३) रवि बाबु वाघेला वय ३४ वर्षे रा.ठी, गुंदवली मेट्रो स्टेशन, अंधेरी पुर्व, मुंबई

आरोपीतांकडुन उघडकीस आलेले गुन्हे

१) जोगेश्वरी पोलीस ठाणे गु.र.क ४३२/२४ कलम ३०४ (२) बीएनएस

सदरची यशस्वी कामगिरी मा. पोलीस सह आयुक्त (का व सु) सत्यनारायण चौधरी, मा. अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग परमजित सिंह दहिया, मा. पोलीस उप आयुक्त, सचिन गुंजाळ, परिमंडळ १०, मुंबई व मा. सहा. पोलीस आयुक्त, डॉ. शशिकांत भोसले, अंधेरी विभाग यांचे मार्गदर्शनाखाली व.पो.नि रमेश भामे, पो.नि. गुन्हे विनोद पाटील यांचे प्रत्यक्ष देखरेखीखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पो.उप. निरीक्षक किशोर परकाळे, शंकर खाडे, पो.ह. पेडणेकर, पो.ह सुर्यवंशी, पो.ह. शिंदे, पो.शि जाधव, पो.शि लोंढे, पो.शि कापसे, पो.शि म्हात्रे, पो.शि मोरे, तांत्रिक मदत पो.ह विशाल पिसाळ यांनी पार पाडली…