महेश कांबळे

ओरिसा येथून गांजा आणून त्याची विक्री करणाऱ्या इसमास अटक केले बाबत…

             दिनांक 09/06/2025 रोजी पोलीस उपनिरीक्षक डॉ. दीपक हिंडे मालवणी पोलीस ठाणे, मुंबई यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की एक इसम  गांजा हा अमली पदार्थ घेऊन येणार याची खात्रीलायक माहिती मिळाली असता , सदरची माहिती सपोआ मालवणी विभाग, नीता पाडवी व वपोनि शैलेंद्र नगरकर यांना देऊन फक्त कमल तलाव, मारवे रोड, मालवणी  मलाड पश्चिम ,या ठिकाणी सापळा रचून एका इसमास ताब्यात घेतल्या असता त्याच्याकडून *4 किलो ४६६ ग्रॅम इतक्या वजनाचा  व किंमत अंदाजे 44,660 रुपये किमतीचा गांजा हा अमली पदार्थ मिळून आला असता, सदर ठिकाणी सविस्तर पंचनामा करून  मालवणी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 713/2025 कलम 8 क सह 20 ब एन डी पी एस कायदा 1985 अन्वये गुन्हा नोंद करून सदर व्यक्तीस अटक करण्यात आली आहे.

अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव पत्ता:- भीमसेन आनंद बिसवाल , वय- 49 वर्ष,
पत्ता :-ओरिसा

सदरची कामगिरी शशिकुमार मीना, अप्पर पोलीस आयुक्त, उत्तर प्रादेशिक विभाग ,पोलीस उपायुक्त परिमंडळ 11- आनंद भोईटे, श्रीमती नीता पाडवी, सहाय्यक पोलीस आयुक्त, मालवणी विभाग, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, शैलेंद्र नगरकर, मालवणी पोलीस ठाणे, जीवन भातुकले, पोलीस निरीक्षक गुन्हे ,मालवणी पोलीस ठाणे ,यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक डाॅ. दीपक हिंडे ,पोह अनिल पाटील, पोह घोसाळकर, पोशि वळतकर, पोशि सोरटे, पोशि सुशांत पाटील, पोशि खुडे, पोशि देसाई, यांनी केली.

तपासी अधिकारी – डाॅ. दिपक हिंडे ( पोलीस उप निरीक्षक)

         आदरपूर्वक,

    ( *शैलेंद्र नगरकर* )
   वरिष्ठ पोलीस निरीक्षक
   मालवणी पोलीस ठाणे,मुंबई.