एस.डी चौगुले

नाशिक शहरात बेवारस वाहनांचा प्रश्न लागणार मार्गी, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचा उपक्रम ,दोनच दिवसांत म्हसरूळ पोलीस ठाणेतील बेवारस व अपघातातील ,७३ वाहनांचा शोध लावण्यांत आला आहे. त्यातील २८ वाहने शिल्लक असून ,दुसऱ्यांदा आवाहन करण्यात येत आहे. शहरात प्रत्येक पोलीस ठाण्याच्या आवारात शेकडो बेवारस वाहने अक्षरशः धुळ खात पडलेली आहेत. या वाहनांचे मालक सापडत नसल्याने, पोलीसांच्या दृष्टीने ही बेवारस वाहने म्हणजेच मोठीच डोकेदुखी झाली आहे. या वाहनांची विल्हेवाट लावण्याची प्रक्रीया, किचकट असल्याने, वर्षानुवर्ष पडीक असलेली ही वाहने सांभाळण्याची जबाबदारी पोलीसांवर आली आहे. मात्र पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी यातुन मार्ग शोधुन काढला आहे. नाशिक शहर पोलीस व गंगामाता वाहन शोध संस्था अध्यक्ष, राम उदावंत यांचे मदतीने ,म्हसरूळ पोलीस ठाण्यातील बेवारस वाहन मालकाचा शोध घेउन, काही वाहने परत करण्यात आले आहे. गंगामाता वाहन शोध संस्थेचे अध्यक्ष राम उदावंत, उपाध्यक्ष बाबासाहेब बागडे व, म्हसरुळ पोलिस ठाणेचे अधिकारी व अंमलदार यांनी, बेवारस वाहनांचे मालकाचा शोध घेण्यात आला आहे. म्हसरूळ पोलीस ठाणे येथे वाहने बेवारस व अपघात स्थितीतील, पोलीसांनी जप्त असलेल्या वाहन मालकांना पत्रव्यवहार करण्यात आला. तरी वाहन मालकानी वाहनसंबंधी कागदपत्र सादर करुन ,आपले वाहन पत्र मिळताच ८ दिवसाचे आत घेउन जावेत. वाहने न नेल्यास कायदेशिर प्रकिया पुर्ण करून, वाहनांचा लिलाव करून आलेली रक्कम शासन भरणा करण्यात येईल. तरी वाहन मालकांनी म्हसरूळ पोलीस ठाण्याशी लवकर संपर्क करावा ,असे आवाहन वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे यांनी सांगितले आहे,