सलाहुद्दीन शेख

दिवाळी निमीत्त मृत कामगारांची आठवण

दिवाळी सणानिमित्त भारतीय कामगार सेना – विमानतळ विभागाच्या वतीने गुरुवार दिनांक ०८ नोव्हेंबर २०२३ रोजी माजी केंद्रीय मंत्री भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार अरविंद सावंत , शिवसेना युवासेना सचिव वरुण सरदेसाई

,संयुक्त सरचिटणीस संजय कदम ,यांच्या प्रमुख उपस्थितीत २०२२-२३ ह्या वर्षात विमानतळ विभागातील मृत्यू झालेल्या कामगारांच्या नातेवाईकांना दिवाळी निमित्त फराळ आणि आर्थिक सहाय्य देण्यात आले.


यावेळी भारतीय कामगार सेनेचे चिटणीस, संतोष कदम, सूर्यकांत पाटील, राजा ठाणगे, योगेश

आवळे, पोपट बेदरकर, सहचिटणीस विजय शिर्के, मिलिंद तावडे, विजय तावडे, संजीव राऊत, निलेश ठाणगे,

बाबा शिर्के आणि विमानतळ विभागातील सर्व पदाधिकारी, कमिटी सदस्य आणि कामगार उपस्थित होते.