संदिप कसालकर
ट्रेनमधून प्रवास करत असताना प्रवाशांना बऱ्याच गोष्टींचा सामना करावा लागतो. कधी वाईट प्रसंग तर कधी ट्रेनच्या सोयी सुविधा प्रवाशांना अस्तव्यस्त करून सोडतात. प्रवाशांचा त्रास कमी व्हावा व त्यांना मदात हवी ह्या साठी RPF जवान असतात. रेल्वेकडून केवळ वाहतूक सुविधाच नाही तर प्रवासादरम्यान सुरक्षा देण्याचंही काम केलं जातं. त्यासाठी प्रत्येक ट्रेनमध्ये आरपीएफ जवान तैनात केले जातात. कधी कधी त्यांची कामगिरी कौतुकास्पद ठरते. काही दिवसांपूर्वी अशीच घटना घडली.
रश्मी मेहता ही महिला दिनांक ८ नोव्हेंबर २०२३ रोजी वलसाड पासून ८:२८ ची सुरत – विरार ट्रेन त्यांनी पकडली. डहाणू पासून लेडीज डब्बा व त्या पुढील काही डब्बे ह्याची लाईट गेली होती. रश्मी मेहता ह्या महिलेने १३९ व १५१२ ह्या नंबर वर बऱ्याच वेळा कॉल केला. पण तो कॉल कनेक्ट झाला नाही. त्यानंतर आरपीएफ चे डीसीपी राठोड सर ह्यांना त्यांनी ११ वाजता संपर्क साधला व राठोड सरांना कॉल लागला,त्यांनी तो फोन उचलला. रश्मी ह्यांनी ट्रेनच्या डब्ब्यांची लाईट गेली ही गोष्ट त्यांना सांगितली. ही गोष्ट ऐकल्यानंतर राठोड यांनी आरपीएफ चे हेड कॉन्स्टेबल गौतम सर ह्यांच्याशी संपर्क साधला. जो पर्यंत रश्मी मेहता ह्यांना मदत होत नाही तो पर्यंत ते कॉल वरती त्यांच्या सोबत जुळून राहिले. राजू डांगर मॅडम आणि रवींद्र कुमार सर पालघर स्टेशन वरती त्यांच्या मदतीसाठी धावत आले. आणि त्यांनी ट्रेन मधल्या प्रवाशांना मदत केली. विरारला पोहोचेपर्यंत कुमार गौतम रश्मी मेहता यांच्यासोबत संपर्कात राहिले. आणि नंतर RPF चे जवान विरारला आले आणि प्रवाशांना लोकल ट्रेनमध्ये बसवले आणि होमगार्डला त्यांनी काळजी घ्यायला सांगितली.
आरपीएफ चे जवान एवढ्या रात्री देखील प्रवाशांसाठी त्यांच्या मदतीला धावून आले. म्हणून रश्मी मेहता यांच्यासोबत इतर प्रवाशांनी त्यांचे आभार मानले.