संदिप कसालकर
दिनांक २५/०९/२०२३ रोजी श्री पुरूषोत्तम भिमा वाघमोडे, वय ४१ वर्षे धंदा : नोकरी ( पो.शि.क.०८०८२०), नेमणूक मेघवाडी पोलीस ठाणे, मेघवाडी मुंबई हे मोबाईल-१ या वाहणावर ०८.०० वाजता हजर झाले. सदर ठिकाणी कर्तव्य बजावत असताना ११:५२ वाजता स्मशानभूमी लगत प्रताप नगर जोगेश्वरी पूर्व मुंबई या ठिकाणी एक इसम आजारी असून झोपलेल्या अवस्थेत पडलेला असल्याचे मो. नं ९८९२५४०१८२ या नंबरवरून त्या मोबाईल धारकाने वेस्ट कंटोलला माहिती दिली असता वेस्ट कंटोलचा मोबाईल १ वाहनास कॉल पडला असता पुरूषोत्तम भिमा वाघमोडे घटनास्थळी जाउन सरकारी वाहन उपलब्ध नसल्याने उपलब्ध खाजगी वाहनाने सदर आजारी इसमास उपचारकामी ट्रॉमा केअर रूग्णालय येथे घेउन गेले असता तेथील डॉक्टरांनी सदर आजारी बेशुध्द अवस्थेत असलेल्या इसमास तपासुन दाखलपूर्व मयत झाल्याचे १२.३६ वा. घोषीत केले. दरम्यान तेथील डॉक्टरांचे सदर बेवारस इसम मयत झाल्याचे पत्र घेवुन व त्याबाबतची खात्री करून संदर्भिय अपमृत्यु प्रकरण दाखल करण्यात आले.
मृत इसम पूरूष जातीचा, धर्म: माहित नाही, वय अंदाजे ४८ वर्षे
मयताचे वर्णन : वर्ण- गोरा, उंची अंदाजे ०५ फुट ०५ इंच, केस काळे, पांढरे, बांधा – सडपातळ, दाढी व मिशी काळी, पांढरी वाढलेली, मयताच्या उजव्या डोळयाखाली जखमेचे काळे व्रण, डाव्या हाताच्या मनगटावर सूज व जखम व त्यावरील त्वचा काळसर निळसर रंगाचीबाजुला काळसर जने चट्टे
सदरचा मृतदेह हा सुरक्षिततेकरीता सिध्दार्थ शवविच्छेदन केंद्र, गोरेगांव (प) मुंबई येथे राखुन ठेवण्यात आलेला आहे.
तरी बेवारस मयत इसमाबाबतची व त्याच्या नातेवाईकाचा शोध घेण्यासाठी आपणस कोणत्याही प्रकारची माहिती मिळाल्यास खालील क्रमांकावर संपर्क करावा.
(०२२) २८२१०८६० व चौकशी अधिकारी (पोलीस उपनिरीक्षक) सचिन ठाकर – मो.क्र ९६८९२८११९२ (मेघवाडी पोलीस ठाणे)