मशीन व साहित्यासह आरोपी मुंबई गुन्हे शाखेच्या तावडीत
संदिप कसालकर
फेव्हीक्वीक या नामांकित कंपनी च्या ब्रँडचे हुबेहुब बनावटीकरण करून तयार केलेला बनावट माल विक्री करणाऱ्या आरोपीस बनावटीकरण करण्याकरीता लागणाऱ्या मशीन व साहित्यासह अटक करण्यात मुंबई गुन्हे शाखेला यश प्राप्त झाले आहे.
दिनांक ३०/१०/२०२३ रोजी गुन्हे शाखा, कक्ष – १०, मुंबई यांना गोपनीय माहिती प्राप्त झाली की, साकीनाका पोलीस ठाणेच्या हद्दीतील एक इसम पिडीलाईट कंपनीच्या फेव्हीक्वीक या नामांकित व मान्यताप्राप्त कंपनीच्या ब्रँडची हुबेहुब नक्कल व रंगसंगती करून स्वामीत्व हक्काचे उल्लघंन करून सदर फेव्हीक्वीकची विक्री करण्याच्या तयारीत साठा करून ठेवला आहे.
नमुद गोपनीय माहितीच्या आधारे दिनांक ३०/१०/२०२३ रोजी कंपनीचे प्राधिकार प्राप्त कंपनीचे अधिकारी आणि गुन्हे शाखा, कक्ष – १०, मुंबई येथील पोलीस पथकाने कुर्ला पश्चिम, मुंबई, येथे छापा टाकला असता तेथे पिडीलाईट इंडस्ट्रीज लि. फेव्हीक्वीक या कंपनीचे हुबेहुब बनावट फेव्हीक्वीक तयार केलेला साठा तसेच सदर बनावट फेव्हीक्वीक तयार करण्याकरिता आवश्यक दोन मशीन, हे सर्व मिळुन आले. सदर पथकाने दिसत्या परिस्थितीचा पंचनामा करून रूपये १०,२९,५००/- इतक्या किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला. सदर प्रकरणी आरोपी नामे हनुमान प्रकाश गुप्ता, वय ५४ वर्षे, रा. ठी- कुर्ला पश्चिम, मुबई यास ताब्यात घेण्यात आले असुन सदर प्रकरणी गु. प्र. शा, गु. नों. क्र.६७ / २०२३ (साकीनाका पो.ठाणे गु.र.क्र. १०३०/२०२३) कलम ४२०, ४८६, ४८८ भादवि सह कलम ५१, ६३ कॉपी राईट अॅक्ट १९५७ अन्वये गुन्हा नोंद करून त्यात आरोपीस अटक केली आहे.
सदर गुन्हयाचा पुढील तपास कक्ष १०, गुप्रशा, गुअवि, मुंबई करत आहेत. अटक आरोपी याचे विरोधात यापुर्वी घाटकोपर पोलीस ठाणे, मुंबई या ठिकाणी गु. नों. क्र. १०३ /२०१०, कलम ४२०, ३४ भादवि सह कलम ५१, ६३ कॉपी राईट अॅक्ट १९५७ अन्वये गुन्हा नोंद आहे.
सदरची यशस्वी कामगिरी मा. पोलीस आयुक्त, विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त, देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शशि कुमार मीना, पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण – १) गुन्हे शाखा राज तिलक रौशन, सहाय्यक पोलीस आयुक्त (डि – पश्चिम ) महेश देसाई, यांचे मार्गदर्शनाखाली, कक्ष-१० गुप्रशा, मरोळ मुंबई येथील प्रभारी पोलीस निरीक्षक दिपक सावंत, पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे, सहाय्यक पोलीस निरिक्षक धनराज चौधरी, गणेश तोडकर, पोलीस अंमलदार पो.ह. दिलीप माने, पो.ह. रामकिसन मोरे, पो.ह. अविनाश चिकणे, पो.ह. दिग्वीजय पानसरे, पो. शि चंद्रशेखर डफळे यांनी पार पाडली आहे.