५ दिवसांसाठी विराजमान झालेल्या गणरायाचे ठिकठिकाणी विसर्जन
२०० हुन अधिक पोलिसांची पवई तलावाशेजारी बंदोबस्त
३ हजार हुन अधिक बाप्पाचे पवई तलावात विसर्जन
देशभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. बाप्पाच्या आगमनाने सर्व वातावरण मंगलमय झाले आहे. दीड दिवसांसाठी विराजमान झालेल्या श्री गणेशाच्या विसर्जनानंतर काल म्हणजेच २३ सप्टेंबर रोजी ५ दिवसांसाठी विराजमान झालेल्या गणरायाचे ठिकठिकाणी विसर्जन झाले. मुंबईतील पवई तलाव येथे मोठ्या प्रमाणात श्री गणेशाच्या विसर्जनासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी पाहायला मिळाली. या वेळी २०० हुन अधिक पोलीस पथक या ठिकाणी सज्ज होत. साधारणतः ३ हजार श्रींचे विसर्जन करण्यात आले.