एस.डी चौगुले
दिनांक २० ते २३ नोव्हेंबर २०२३ रोजी, कर्जत येथे युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशन इंडिया च्या वतीने, राज्यस्तरीय शिबिर आयोजन करण्यात आला ,प्रमुख आयोजक डॉक्टर रेनशी मंदार पनवेलकर होते .
राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबीर मध्ये राष्ट्रीय कराटे स्पर्धेकरीता ,निवड चाचणी व ब्लॅक बेल्ट जूनियर व सीनियर एक्ज़ाम पार पडल्या,
या शिबिरामध्ये पनवेल, खोपोली, पेण, कर्जत,मुंबई तालुक्यातील एकूण ७० कराटेपट्टू सहभागी होते. सदर शिबिरात ब्लॅक बेल्ट एक्ज़ाम आणि डिग्री एक्ज़ाम व राष्ट्रीय स्पर्धा निवड चाचणी मध्ये प्राविण्य मिळविलेल्या खेळाडूंची नावे अश्याप्रमाणे आहेत
ब्लॅक बेल्ट, राजेंद्र कान्हेरे, प्रथम बहिरा, पंक्ती पाठक, हर्षल घरत, किसन बोगटी, सानवी जाधव, आदित्य खाडे, जयराज बोराडे, हार्दिक तुरे, ऋतुजा जाधव, संदेश सुनार, धनंजय शर्मा,
डिग्री ब्लॅक बेल्ट , आस्था चौधरी, रुत्वी पाटील, आलोक निर्मल, कृपाश्री शेट्टी,अथर्व रांजणे
डिग्री ब्लॅक बेल्ट , परशुराम शेट्टीगिरी हयांनी सुयश संपादित केले.
सीनियर मास्टर ब्लॅकबेरी 7 दान पदवी, शिहान सुनील वडके यांना प्रशस्तीपत्रक व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले,
तसेच सीनियर पोलीस निरीक्षक आंतरराष्ट्रीय ग्रँड मास्टर डॉक्टर प्रदीप महादेव मोहिते यांनी जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उल्लेखनी कामगिरी केल्याबद्दल, तसेच
उत्कृष्ट पोलीस प्रशिक्षक असल्या बद्दल ,शाल व स्मृतिचिन्ह देऊन माननीय डॉक्टर मंदार पनवेलकर राष्ट्रीय अध्यक्ष युनायटेड शोतकांत कराटे टू इंडिया यांनी सन्मानित केले.
सदर शिबीरा मध्ये महाराष्ट्र पोलीस चीफ कमांडो व, मार्शल आर्ट ट्रेनर हांशी प्रदीप मोहिते, सीनियर पोलीस इन्स्पेक्टर आंतरराष्ट्रीय ग्रँड मास्टर, शिहान सुनील वडके, यांनी मुख्य परीक्षक म्हणून काम पाहिले.
तसेच शिहान रविंद्र म्हात्रे, शिहान सागर कोळी, शिहान पियुष सदावर्ते, शिहान निलेश भोसले, शिहान प्रशांत गांगुर्डे, सेन्सई भालचंद्र भोईर सेन्सई जीवन धाकवळ, सेन्सई संदीप आगीवले, सेन्सई संजय पाटील, सेन्सई प्रविण पाटील, सेन्सई प्रतिक कारंडे यांनी प्रशिक्षण दिले.
तसेच सदर राज्यस्तरीय शिबिरामध्ये भाग घेतलेल्या खेळाडूंना, राष्ट्रीय स्पर्धे करीता निवड करण्यात आली आहे, तसेच कलर बेल्ट व ब्लॅक बेल्ट परीक्षा ऊत्तीर्ण खेळाडूंचे युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशन इंडियाचे अध्यक्ष, रेंशी डॉक्टर मंदार पनवेलकर यांनी अभिनंदन केले तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या