एस.डी चौगुले
३ डिसेंबर २०२३ रोजी कालिदास क्रीडा संकुलन मुलुंड मुंबई येथे,इप्पॉन युथ मार्शल आर्ट्स अँड स्पोर्ट्स फाउंडेशन स्पर्धेचे आयोजक शिहान रोहित सौदा, (संस्थापक अध्यक्ष) तसेच सरचिटणीस सेन्सी विद्या मुळे यांच्या द्वारे हे स्पर्धा आयोजित करण्यात आले,
या स्पर्धेत 480 हुन अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.संपूर्ण भारता मधील मुंबई सर्व मुंबई शहर व उपनगर, मुंबई विभाग,महाराष्ट्र तील नामांकित संघ, तसेच महाराष्ट्र पोलीस टीम PTC मरोळ मुंबई,
हरियाणा, उत्तर प्रदेश आणि गुजरात या राज्यांनी सहभाग घेतला.या स्पर्धेत महाराष्ट्र पोलीस PTC मरोळ संघाचे मुख्य ट्रेनर हनशी डॉक्टर. प्रदीप महादेव मोहिते आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर ,
यांनी या स्पर्धेत खुल्या ओपन सीनियर गटात, काथा व कूमिते दोन्ही प्रकारांमध्ये ,दोन सुवर्णपदक प्राप्त केले व महाराष्ट्रचे नाव या राष्ट्रीय स्पर्धेत उंचावले ,
या स्पर्धेत कर्नाटकातील सेन्सी आनंद वालम्की याने प्रथम क्रमांकाची ट्रॉफी जिंकली.
हरियाणाच्या सेन्सी मोहम्मद दौदने द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी जिंकली.सेन्सी आर.बी राय यांचा कडून मुंबईत तिसरे स्थान पटकावले.
टिटवाळा येथील सेन्सी पंचशिलाने चौथा क्रमांक पटकावला.
मोठ्या संघासह पाहुणे व स्पर्धेचे उद्घाटन ,शिवसेना प्रतिष्ठान चे अध्यक्ष शैलेश पवार, शाखाप्रमुख भालेश मात्रे, शिवसेना उपविभाग संघटक सौ नंदिनीताई सावंत तसेच
अनंत कळवणकर, सुनील पडवेकर, सुनील जाधव ,त्याच प्रमाणे विशेष पाहुणे म्हणून अमित देशमुख, व प्रियंका ताई गाडे यांनी स्पर्धेत झालेल्या सर्व खेळाडूंचे स्वागत व मार्गदर्शन केले
व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या ,या स्पर्धेमध्ये पंचाची मुख्य भूमिका एशियन रेफ्रि हान सर्वेजीत सिंग, व विकी साहू मॅनेजमेंट यांनी मुख्य भूमिका
बजावली ,सर्व विजेता खेळाडूंना सर्व क्रीडा विभागा तर्फे हार्दिक अभिनंदन करण्यात आले व पुढील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेण्याकरता हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या