संदिप कसालकर
गोंदिया – आमगाव तालुक्याच्या मक्कीटोला येथे घरफोडी करणाऱ्या तरूणाला ठोकल्या बेड्या,चोरीचा मुद्देमाल हस्तगत,स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी
गोंदिया – जिल्ह्याच्या आमगाव तालुक्यातील मक्कीटोला येथील घराला कुलूप लावून शेतात गेलेल्या व्यक्तीच्या घरी चोरी झाल्याची घटना घडली होती.याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने तपासाचे सूत्र फिरवत गावातीलच चोरटा धर्मेंद्र मनीराम मडामी वय 29 वर्षे याला बेड्या ठोकल्या.त्याच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.मुन्नालाल भैय्यालाल ठाकरे वय.64 वर्षे रा.
मक्कीटोला,आमगाव हे शेतात गुरांसाठी गवत आणण्यास गेले होते. त्यांची पत्नी व मुलगा हे सुद्धा बाहेर गेले होते.घरी कोणीही हजर नसताना त्यांच्या घराचे समोरील दाराला लागलेले कुलूप व घरातील लोखंडी आलमारीचे दार तोडून आलमारीतील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 42 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरीला गेला होता. याची तक्रार आल्यानंतर आमगाव पोलीसांनी गुन्हा दाखल केला. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आमगाव परिसरात चोरट्याचा शोध घेत होते. समांतर तपास करीत असताना पथकाने गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे संशयित गुन्हेगार धर्मेंद्र मनीराम मडामी याला ताब्यात घेतले.
घरफोडीच्या अनुषंगाने कसून चौकशी केली असता त्याने प्रथम उडवा उडवीची उत्तरे दिली.त्याला पोलीसी खाक्या दाखवत पुन्हा विश्वासात घेऊन सखोल विचारपूस करुन चौकशी केली असता गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याच्या कडून चोरी केलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आणि चोरट्याला आमगाव पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले.
प्रतिनिधि – चेतन समरीत/महाराष्ट्र पोलीस न्यूज चैनल गोंदिया