संदिप कसालकर

घडलेला प्रकार:
दिनांक २६/१०/२०२३ रोजी १२:१५ वा चे सुमारास फिर्यादी नामे श्रीकांत सुदाम सोनावले, वय ४७ वर्षे, व्यवसाय नोकरी (बी.पी.टी. रेल्वे स्टेशन इंचार्ज) यांना ट्रॅक एक्झामिन करीत असताना रेल्वे बी.पी.टी. गेट नं. ०४ व ०५ चे मध्ये ओव्हर हेड इलेक्ट्रीक वायर, एम.बी.पी.टी. क्र. १४९ ते १५० मध्ये, चिंध्धी गल्ली, डॉ. चित्रांगण बुट्टा यांचे दवाखान्याचे मागे, वडाळा (पुर्व), मुंबई ३७ याठिकाणी अज्ञात इसमाने कोणत्यातरी हत्याराने एक अंदाजे ३५ ते ५० वर्षे वयाची अनोळखी महिलेच्या डोक्यात मारहाण करून तिची मतृदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला म्हणुन फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून वडाळा पोलीस ठाणेस गु.र.क्रं. १९१/२३, कलम ३०२, २०१ भा.दं.वि. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

असा लावला गुन्ह्याचा छडा ?
नमुद गुन्हयाच्या तपासाच्या अनुषंगाने पोलीस उप आयुक्त, संजय लाटकर सो, सहाय्यक पोलीस आयुक्त, विजय भिसे, वपोनि मिलींद जाधव यांचे देखरेखीमध्ये पो.नि. गुन्हे, विकास म्हामुणकर, स.पो.नि प्रसाद शेकदार, पोलीस उप निरीक्षक, अमृता गारूळे, पोलीस उप निरीक्षक, प्रशांत रणवरे व शरद खाटमोडे, पोउनि अमोल जगदाळे व पथक तसेच शिवडी पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक, सचिन माने, स.पो.नि. स्नेहलसिंह खुळे व पथक, स.पो.नि. काळेकर व पथक, येलोगेट पो. ठाणेचे स.पो.नि. शेळके व पथक यांच्या १२ पथकं तयार करून नमुद गुन्हयातील मृतदेहाची ओळख पटविण्याकरीता वडाळा पोलीस ठाणे हद्दीतील चिंधी गल्ली, नित्यानंदनगर, शहीद भगतसिंग नगर, संगमनगर तसेच मांडुगा, अॅन्टॉपहिल, वडाळा टी.टी., आर.ए.के. मार्ग पोलीस ठाणे हद्दीत रवाना करून कोणी महिला मिसींग आहे काय याबाबत चौकशी करण्याकरीता टीम रवाना केल्या. तसेच मृतदेहाचे फोटो व मतृदेहावरील दागिने यांचे फोटो काढून वडाळा व आजुबाजुच्या परिसरात प्रसिध्दी पत्रक वाटप केले तसेच व्हॉट्सअॅपद्वारे देखील प्रसिध्दी दिली.
नमुद टीम यांना तपासादरम्यान शहीद भगतसिंग रोड, चिंधी गल्ली येथील इटर्नल दोस्ती, को. ऑ.हौ.सो.सो. बिल्डींगमध्ये राहणारी महिला नामे आरिफा जहीरूद्दीन काझी यांचेकडे चौकशी केली असता ३ ते ४ दिवसापासुन त्यांच्याकडे काम करणारी महिला नामे सुग्राबी हुसेन मुल्ला, अंदाजे वय ७० ते ७५ वर्षे ही कामावर येत नसल्याचे समजले. त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी वडाळा पोलीस ठाणे हद्दीतील चिंधी गल्ली, नित्यानंदनगर, शहीद भगतसिंग नगर, संगमनगर तसेच मांडुगा, अॅन्टॉपहिल, वडाळा टी.टी., आर.ए.के. मार्ग पोलीस ठाणे हददीत रवाना केल्या. तपासा दरम्यान त्यांचा एक मुलगा संगमनगर व दुसरा मुलगा उलवे, नवी मुंबई येथे राहत असल्याची माहिती मिळाली व त्यांना विश्वासात घेवुन त्यांचेकडून मतृदेहावरील प्राप्त दागिने व शरीरावरून ओळख पटविली. गुन्हयाच्या अनुषंगाने श्वान पथक, फिंगरप्रिन्ट, न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा, कालिना, सांताकुझ, मुंबई यांचे मदतीने घटनास्थळावरून भौतिक पुरावे मिळविण्याकरीता मदत घेण्यात आली.

“खाला चाय पिने को आओ” असे बोलून फासले महिलेला
तसेच तपासा दरम्यान मोहमद फैज रफीक सय्यद उर्फ बाबा, वय २७ वर्ष, धंदा नोकरी नाही, रा. ठि. – रूम नं. ६९, शहीद भगतसिंग नगर, बी.पी. टी. गेट नं. ०५, वडाळा (पूर्व), मुंबई ३७ यांचेकडे चौकशी केली असता त्याने नमुद मयत महिला हिला “खाला चाय पिने को आओ” असे बोलून तिला चहा पिण्याच्या बहाण्याने घरी बोलाविले व तिच्या शरीरावरील सोन्याचे दागिने पाहुन त्याच्या मनात लालच निर्माण झाली व त्याने तिच्या डोक्यात रॉड मारला त्यानंतर नमुद महिला जमिनीवर पडून जागीच ठार झाल्याने तिची विल्हेवाट लावण्याकरीता त्याने महिलेचा मृतदेह गोणीमध्ये भरून त्याच्या राहत्या घराच्या पहिल्या माळयावरील १.५ X १.५ च्या खिडकीमधुन तिला बाहेर टाकले व कोणीही व्यक्ती नसल्याचे खात्री करून तिची ओळख मिटविण्याकरीता ज्वलनशिल पदार्थ टाकुन जाळुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

यशस्वी कामगिरी
सदरची कामगिरी, पोलीस सह आयुक्त, का व सु, सत्यनारायण चौधरी, अपर पोलीस आयुक्त, द.प्रा.वि. डॉ. अभिनव देशमुख सर, पोलीस उप आयुक्त, बंदर परिमंडळ संजय लाटकर, सपोआ विजय भिसे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मिलींद जाधव यांचे नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) विकास म्हामुणकर, पोलीस निरीक्षक सचिन माने (शिवडी), स.पो.नि. प्रसाद शेकदार, पोउनि अमोल जगदाळे, पोउनि प्रशांत रणवरे, पोउनि शरद खाटमोडे, पोउनि अमृता गारूळे, तसेच शिवडी पोलीस ठाणेचे स.पो.नि. स्नेहलसिंह खुळे व पथक, स.पो.नि. काळेकर व पथक, येलोगेट पो. ठाणेचे स.पो.नि. शेळके व पथक, स.पो.नि. विशाल गायकवाड, पो.ह. ०३१०४३/ भोसले, पो.ह.क्र. ०६५०५ / संतोष पवार, पो.ह.क्र. ०४०९४१ / घाडगे पो.शि.०८०७९८/भोरे, पो.शि.क्रं. ०९२०६७/ देविदास पालवे, पो.शि. क्रं. ०९१९४८ / प्रकाश कोळी, पो.शि. ११०५०८/ मखरे, पो.शि.११३२०४ /साळवे, पो.शि. ११३४१४ / बाबर, पो.शि. १४०२९०/ काटे, पो.शि.क्रं. १४०६९९ / वलेकर, शिवडी पो. ठाणेचे पो.ह.क्रं. ००५६६/मुजावर, पो.शि. १११६२७/आठरे, पो.शि. १११६६१ / जाधव, पो.शि. १४०५८५/माळोदे, पो.शि.क्रं. १४०२८९ / अमोल बच्छाव या पथकांनी यशस्वी कारवाई केली आहे.