संदिप कसालकर

अंधेरी पोलीस ठाणे कडुन करण्यात आलेल्या कारवाईबाबत:
दिनांक ३०/१०/२०२३ रोजी अंधेरी पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोउनि अमित यादव व पथकास गुप्त बातमीदाराद्वारे ०१ इसम देशी बनावटीचे अग्निशस्त्र हे अंधेरी पोलीस ठाणे हद्दीमध्ये घेउन येणार असल्याची खात्रीशीर माहीती प्राप्त झाली. त्याअनुषंगाने अंधेरी पोलीस ठाणेच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने न्यु नागरदास रोड, सुप्रिम लि. कंपनीच्या समोरील फुटपाथ, अंधेरी पूर्व, मुंबई या ठिकाणी सापळा एका इसमास शिताफिने तब्यात घेतले. व त्याची अंगझडती घेतली त्याच्या कंबरेच्या उजव्या बाजुला पॅन्टीला खोचलेला देशी बनावटीचा कट्टा व त्यामध्ये एक जिवंत काडतुस मिळुन आले.

कायदा कलम:
विस्था गु.र.क्र. ५४० / २३ कलम ३, २५ भा. ह. कायदा सह ३७ (१) १३५ मपोका अन्वये गुन्हा नोंद करुन सदर इसमास नमूद गुन्हयात अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा अधिक तपास चालू आहे.

अटक इसमाचा नाव व पत्ता:
मो.शाहिद शामिम अन्सारी वय २६ वर्षे, रा. ठी- रुम नं. ५, गेट नं. ८, अंबुजवाडी मित्तल एकता वेलफेअर सोसा, मालवणी, मुंबई.

अटक इसमाचा गुन्हे अभिलेख:
मालवणी पोलीस ठाणे गु.र.क्र. १०३९/२१ कलम ३८०,३४ भादवि.
अग्निशस्त्राचे वर्णन-
अ) देशी बनावटीचा कट्टा, एकुण लांबी २६ सें. मी, मुठीची लांबी ११ सें. मी, बॅरेलची लांबी १२.५ सें.मी., लाकडी मुठ त्यास लोखंडी आवरण असलेले, लोखंडी धातुचे देशी बनावटीचे अग्निशस्त्र.
ब) एक ८ एम.एम, के एफ ( असे इंग्रजीत लिहलेले ) पिवळया रंगाचे जिवंत काडतुस .

अश्या प्रकारे करण्यात आली कारवाई:
दि.०१/११/२०२३ रोजी एमआयडीसी पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोउनि यश पालवे व पथकास गुप्त बातमीदाराकडून माहिती प्राप्त झाली की, एक इसम पुनमनगर बी. एम. सी. स्कुल जवळ, पुनमनगर म्हाडा कॉलनी, अंधेरी पूर्व, मुंबई या ठिकाणी रिव्हाल्वर किंवा पिस्तोल सारखे अगीशस्त्र हत्यार घेवून येणार आहे. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण पथकाने पुनमनगर बी. एम. सी. स्कुलजवळ, पुनमनगर म्हाडा कॉलनी, अंधेरी पूर्व, मुंबई या ठिकाणी सापळा रचला. त्यावेळी एक इसम त्याच्या अंगावर काहीतरी वस्तु लपविण्याचा प्रयत्न करू लागला. सदर इसमाचा संशय वाटल्याने सदर इसमाची अंगझडती घेतली असता त्याच्या जवळ खालील नमुद वर्णनाची मालमत्ता मिळुन आल्याने एमआयडीसी पोलीस ठाणे वि. स्था.गु.र.क्र. ६९३/२०२३, कलम ३,२५ भा.ह.का. सह कलम ३७ (१), १३५ मपोका अन्वये गुन्हा नोंद करुन सदर इसमास नमूद गुन्हयात अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा अधिक तपास चालु आहे.

अटक आरोपींचा तपशील:
अब्दुल कादर सलीम शेख, वय ४२ वर्षे, धंदा – चालक, रा. ठि. आराम रहिवाशी संघ, इंदिरानगर झोपडपटटी, पीएमजीपी म्हाडा कॉलनी, जोगश्वरी पुर्व, मुंबई.

इतर पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपशील:
१. भायखळा पो.
गुन्हेगारी पुर्वाअभिलेख – ठाणे,
गु.र.क्र. ३५८/१६,
कलम ३०७,३२४,३२३,१४३, १४४, १४८, १४९ भादविसं
२. मुलूंड पो. ठाणे, गु.र.क्र. १७७ /२००८, कलम ३७९ भादिवंस, ३. एमआयडीसी पो. ठाणे, गु.र. क्र. ६११/२००८, कलम ३७९ भादविसं, ४. एमआयडीसी पो. ठाणे, गु.र.क्र. ५२५/२००८, कलम ३७९ भादविसं, ५. एमआयडीसी पो. ठाणे, गु.र.क्र. ३९३/२०१०, कलम ३७९ भादविसं,
६. एमआयडीसी पो. ठाणे, गु.र.क्र. ५२६/२०१६, कलम ३७९ भादविसं, ७. एमआयडीसी पो. ठाणे, गु.र.क्र. ७४८/२०२१, कलम ३७९ भादविसं, ८. एमआयडीसी पो. ठाणे, गु.र.क्र. ८०६/२००८, कलम ३७९ भादविसं, ९. सहार पो. ठाणे, गु.र.क्र. २७४/२०१६, कलम ३७९, ३४ भादविसं, १०. सहार पो. ठाणे, गु.र.क्र. ९८/२०१६, कलम ३७९ भादविसं

अटक आरोपीताच्या अंगझडती मिळुन आलेल्या पिस्टल, काडतुसे, मॅगझिन व मोबाईले चे वर्णन:
१. एक INDIAN बनावटीचे ०.३२ पिस्टल, त्याच्या स्टील बॉडीवर 0.32 ” PISTEL CIVIL IN GSF 200300314 0.32 “ INDIAN ORDNANCE FACTORY असे स्ट्रोक करून कोरलेले, (लिहलेले), तसेच पिस्टलच्या बटवर लाकडी डिझाईन असुन त्यावर स्ट्रार कोरलेला दिसत असुन त्यामध्ये INDIA असे लिहलेले आहे.तसेच पिस्टलच्या स्टील बॅरलवर 110 MPA, 7.65 X 17.18 असे स्ट्रोक करून कोरलेले, (लिहलेले),
पिस्टलची एकुण लांबी १६ सें.मी., बटची लांबी ८.५ सें.मी., अं.कि. १,२५,०००/- रू. २. ०५ जिवंत काडतुसे त्यावर KF 7.65 असे इंग्रजीमध्ये स्ट्रोक करून कोरलेले (लिहिलेले), तसेच दोनच्या स्टीलच्या मॅगझिन अं. कि. ५,०००/- रू

अशा प्रकारे बेकायदेशीर अग्नीशस्त्र बाळगणा-या आरोपीतांस अटक करण्यात व त्याचेकडुन अग्निशस्त्र हस्तगत करण्यात अंधेरी व एमआयडीसी पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी व अंमलदार यांना यश प्राप्त झालेले आहे.

यशस्वी कामगिरी:
सदरची यशस्वी कामगिरी पोलीस सह आयुक्त (का व सु) सत्यनारायण चौधरी, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, परमजित सिंह दहिया, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ १० मुंबई, दत्ता नलावडे, सहायक पोलीस आयुक्त अंधेरी विभाग, मुंबई डॉ. शशिकांत भोसले, यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संताजी घोरपडे व पोलीस निरीक्षक गुन्हे बालाजी दहिफळे यांच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली अंधेरी पोलीस ठाणेचे पोउनि अमित यादव, पोह. ०३२९४ / सुरनर, पोशि.०३१२२३/कांबळे, पोशि. ०७१०१९ / जाधव, पोशि. ०७१४७६ / बाबर, पोशि११२९५७/टरके, पोशि. १३०१००/ नरबट, पोशि. १३०२८६ / पाटील यांनी व एमआयडीसी पोलीस ठाणेचे वपोनि सतीश गायकवाड, पोनि विट्ठल आर्डेकर, पोउनि यश पालवे, पोह. ३३६०३ / काळे, पोह.०४०३१४ / पुजारी, पोह.०६०८२४/नलावडे, पोशि. ०७०९६४ / पवार, पोशि ०९०७३८ / चव्हाण, पोशि ०९२०३७ / पवार यानी उल्लेखनीय कामगिरी पार पाडली.