एकूण ५ चोरीचे गुन्हे देखील आणले उघडकीस
संदिप कसालकर
पवई पोलिसांनी ऑटो रिक्षा चोरी करणाऱ्या आरोपीस अटक करून ऑटो रिक्षा चोरीचे एकूण ५ गुन्हे उघडकीस आणले आहेत.
फिर्यादी यांनी पवई पोलीस ठाणे, मुंबई येथे समक्ष येवून फिर्याद दिली की, दिनांक २२/०९/२०२३ रोजी २१.१५ वा ते दिनांक २३/०९/२०२३ रोजी १०.०० वा. चे दरम्यान वी वर्क गेटसमोर, जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड, पवई मुंबई या ठिकाणी त्यांची पार्क केलेली ऑटो रिक्षा ही कोणीतरी अज्ञात इसमाने चोरी केल्याबाबत पवई पोलीस ठाणे, मुंबई दिलेल्या फिर्यादीवरून गु.र.क्र. ५५८/२०२३ कलम ३७९ भा. द. वि. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.
पवई पोलीस ठाणेस दाखल वर नमुद गुन्हयाचा तपास गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सपोनि संतोष कांबळे व गुन्हे प्रकटीकरण पथकाने केला असता तांत्रिक तपास व गुप्त बातमीदार यांचेकडून माहिती प्राप्त करून सदर गुन्हयात आरोपी नामे जाकीरहुसेन फसाटे यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न केले. त्यानंतर त्यास पोलीस पथकाने सापळा लावून चांदशहाँवली दर्गा, नीटी पवई येथून शिताफीने ताब्यात घेवून त्यास नमुद गुन्हयातील सहभागावरून अटक करण्यात आली.
पवई पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी व पथक यांनी अटक आरोपीकडे कौशल्यपुर्ण तपास करून ऑटो रिक्षा चोरीचे पवई पोलीस ठाणेचे ४ गुन्हे व विक्रोळी पोलीस ठाणेचा १ गुन्हा असे एकुण ५ गुन्हे उघडकीस आणून ऑटो रिक्षा हस्तगत करण्यात आल्या आहेत.
अटक आरोपीताचे नाव व पत्ता
जाकीरहुसेन गुलाम मोहम्मद हुसेन फसाटे, वय २३ वर्षे, धंदा – चालक, रा. ठि. छोटया बावडी जवळ, चाँद शाहवली दर्गा, पेरू बाग, निटी, पवई, मुंबई
आरोपीचा अभिलेख
१) पवई पोलीस ठाणे गु.र.क्र.१२७/२०२०, कलम ३२६,३२४,३२३,५०४,३४ भा.द.वि. २) पवई पोलीस ठाणे गु.र.क्र.१०४५/२०२२, कलम ३२४, ५०४,३४ भा. द. वि.
आरोपीकडून हस्तगत करण्यात आलेली मालमत्ता
१) पवई पोलीस ठाणे गु.र.क्र.४८६/२०२३, कलम ३७९ भा.द.वि. ऑटो रिक्षा क्र. एम. एच. ०३ बीटी. ९९०५ २) पवई पोलीस ठाणे गु.र.क्र.५५८/२०२३, कलम ३७९ भा.द.वि. ऑटो रिक्षा क्र. एम. एच. ०३ डीसी. ०५७० ३) पवई पोलीस ठाणे गु.र.क्र.५९९/२०२३, कलम ३७९ भा.द.वि. ऑटो रिक्षा क्र. एम. एच. ०३ डीसी. २१९५ ४) पवई पोलीस ठाणे गु.र.क्र.६०९/२०२३, कलम ३७९ भा.द.वि. ऑटो रिक्षा क्र. एम. एच. ०३ सीएन. ५५७१ ५) विक्रोळी पोलीस ठाणे, गु.र.क्र.४६०/२०२३, कलम ३७९ भा.द.वि. उघडकीस आणला आहे.
सदरची यशस्वी कामगिरी मा. पोलीस सह आयुक्त ( का व सु) श्री सत्यनारायण चौधरी, मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, श्री. परमजीत सिंह दहिया, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ – १०, श्री दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, साकीनाका विभाग, मुंबई, श्री भारतकुमार सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनवणे व पोलीस निरीक्षक गुन्हे श्री गणेश पाटील यांच्या प्रत्यक्ष देखरेखेखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी स.पो.नि. संतोष कांबळे, पो.ह. क्र. ९६०६०७ / तानाजी टिळेकर, पो.ह. क्र. ४९२५ / बाबू येडगे, पो.ह. क्र. ०३८६०/आदित्य झेंडे, पो.शि.क्र. ०६१८२१ / संदिप सुरवाडे व पो.शि.क्र. ०९८४१ / सुर्यकांत शेट्टी यांनी पार पाडली आहे.