रश्मी मेहता
चोरी व गहाळ झालेले २५ मोबाईल फोनचा शोध घेण्यात देवनार पोलिसांना यश प्राप्त झाले आहे.
देवनार पोलीसांनी सन २०२३ मध्ये चोरी व गहाळ झालेल्या मोबाईल फोनचा शोध घेत २५ मोबाईल फोन सात्यत्याने पाठपुरावा करून मुंबई शहरातून हस्तगत केले.
नमुद मोबाईलचा शोध मा. अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, श्री विनायक देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त, श्री हेमराजसिंह राजपूत, सहायक पोलीस आयुक्त, देवनार विभाग, श्री संजय डहाके यांचे मार्गदर्शनाखाली मा. श्री राजेश केवळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, देवनार पोलीस ठाणे, मुबंई यांचे नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाने सायबर कक्षाचे अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक श्रीराम घोडके, मपोशि शिल्पा जोरे व सुवर्णा शिवतर यांनी केलेली आहे.
सदरचे २५ मोबाईल मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ६, श्री हेमराजसिंह राजपूत यांचे हस्ते दिनांक १७/१०/२०२३ देवनार पोलीस ठाणे, मुंबई येथे मुळ मालकास परत करण्यात आले.
२५ मोबाईल्सचा शोध घेण्यात देवनार पोलिसांना यश!
Related Posts
गुलाबाचे फूल आणि पुष्पगुच्छ! पोलिसांच्या मेहनतीचे अनोखे कौतुक!
जोगेश्वरी: कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अहोरात्र मेहनत करणाऱ्या पोलीस दलाचा सन्मान हा समाजासाठी प्रेरणादायी ठरतो. याच उद्देशाने पत्रकार संदीप कसालकर यांनी मेघवाडी पोलीस ठाण्याचे इन्चार्ज प्रदीप यादव, तसेच कर्तव्यदक्ष अधिकारी…
रस्ते वाहतूक सुरक्षा दिनानिमित्त जोगेश्वरीत अनोख्या फ्लॅशमॉफची चर्चा!
संदिप कसालकर जोगेश्वरी, १२ जानेवारी २०२५ – रस्ते वाहतूक सुरक्षा दिनाचे औचित्य साधत जोगेश्वरी पूर्वेतील शामनगर लोकमान्य टिळक गणेश विसर्जन तलाव सिग्नल व जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवरील हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे…