

सलाहुद्दीन शेख
वर्सोवा पोलीस ठाणे हद्दीत दुखापत करून जबरी चोरी करणाऱ्या आरोपींना १२ तासाच्या आत अटक
प्रस्तुत गुन्हयातील फिर्यादी हे रिक्षा चालविण्याचे काम करतात. दिनांक २४/०९/२०२४ रोजी रात्रौ ०१:३० वा. चे सुमारास फिर्यादी हे वर्सोवा पोलीस ठाणे हद्दीतील चाय कॉफि बस स्टॉप, जे पी रोड वर्सोवा अंधेरी प. मुंबई या ठिकाणी फोनवर बोलत असताना चार अनोळखी इसमांनी संगनमत करून चाकुचा धाक दाखवुन त्यातील एका इसमाने जबरजस्तीने फिर्यादींच्या खिश्यातील फोन व रोख रक्कम १५०००/- रूपये इत्यादी मालमत्ता हिसकावुन घेतली. फिर्यादींनी त्यास प्रतिकार केला असता, त्यातील एका इसमाने फिर्यादींच्या हातावर चाकुने वार करून त्यांना दुखापत केली व दोन मोटार सायकलवर बसुन आरोपी पळुन गेले असल्याबाबत पोलीस ठाणेस तक्रार प्राप्त झाल्याने तात्काळ फिर्यादींचा जबाब नोंद करून गु.र.क्र. ५४५/२०२४, कलम ३०९ (६), ३ (५) भारतीय न्याय संहिता सह १३५ म.पो. का अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
प्रस्तुत गुन्हा हा गंभीर गुन्हा स्वरूपाचा असल्याने तात्काळ पोलीस ठाणेचे तीन तपास पथके तयार करण्यात आली. गुन्हयात वापरलेली मो/सायकलचा क्र. हा फिर्यादींनी दिल्याने तांत्रिक माहिती घेवुन आरोपीत हे मेघवाडी परिसरात असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलीस पथकाने त्यांचा कसोशिने शोध घेतला असता इसम १) सुनित अनिलकुमार तिवारी, वय २० वर्षे, धंदा नाही, रा.ठि. रूम नं. केईम/१४३, जिवा भाई सुखर पटेल चाळ, हनुमान मंदिराजवळ, हरीनगर, जोगेश्वरी पुर्व, मुंबई. २) विकास ईश्वर खारवा, वय २४ वर्षे, धंदा डी जे वाजविणे, रा.ठि. रूम नंबर ०१, बिल्डींग नं. ६, नवकिरण सोसायटी, हरी नगर जोगेश्वरी पुर्व, मुंबई. ३) राहुल अशोक राणा, वय २३ वर्षे, रा.ठि. ए/७०६, साईरूप को. ऑप हौ. सोसायटी, बिल्डींग क्र. ०९, महाकाली रोड, अंधेरी पुर्व, मुंबई हे मिळुन आल्याने पुढील चौकशीकामी पोलीस ठाणेस आणुन त्यांचेकडे गुन्हयाच्या अनुषंगाने सखोल चौकशी केली असता त्यांचा नमुद गुन्हयातील सहभाग निष्पन्न झाल्याने नमुद इसमांना प्रस्तुत गुन्हयात अटक करण्यात आलेली आहे.
वर नमूद आरोपीतांना मा. न्यायालयासमक्ष हजर केले असता मा. न्यायालयाने ३ दिवस पोलीस कोठडी रिमांड मंजुर केले आहे. आरोपीतांनी गुन्हयात वापरलेले हत्यार, मो/सायकल हस्तगत करण्यात आलेली आहे. तसेच फिर्यादीचा जबरदस्तीने हिसकवलेला मोबाईल तसेच रोख रक्कम हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ९, बांद्रा, मुंबई, श्री. राजतिलक रोशन सो व मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, दा. नौ. नगर विभाग श्री. मृत्युंजय हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. गणेश पवार, पोलीस निरीक्षक गुन्हे श्री. सचिन शिर्के, गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोउनि श्री. नागेश मिसाळ, पोउनि जाधव तसेच सपोनि जाधव, पोउनि उगले, पोउनि पाटील तसेच गुन्हे पथकातील अंमलदार पो.ह. महाडेश्वर, पो.शि. गोसावी, रकटे, थोरात, भोईर, पो.ह. पवार पो.शि. ईनामदार, साबळे, पठाण, घाडगे यांनी केली आहे.