
प्रतिनिधी: अवधुत सावंत
डोंबिवली दि.१० : आज दिनांक १०/०१/२०२६ रोजी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या अनुषंगाने आचारसंहिता कालावधीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता मा. वरिष्ठांच्या आदेशान्वये घटक कार्यालय कार्यक्षेत्रात अवैध्य धंध्यांवर कारवाई करीता पॅट्रोलिंग करीत असता पोशि. गोरक्ष शेकडे यांना प्राप्त बातमीनुसार मानपाडा पोलीस ठाणे हद्दीत पुढील प्रमाणे कारवाई करण्यात आल्या आहेत.

१) वडवली व शिरढोण गावाच्या सीमेवरील नदीच्या काठावर, मोकळ्या जागेत, वडवली शिरढोण, ता. कल्याण, जि. ठाणे या ठिकाणी आरोपी नामे राजेशकुमार रामयशस्वी यादव (वय: ३० वर्षे), राहणार ठीकाण कीर्तिराज चाळ, रुम. नं. १४, घेसरगांव, ता. कल्याण. जि. ठाणे व त्याचे तीन साथीदार हे अवैधरित्या गावठी हातभट्टीची दारू तयार करीत होते व त्यासाठी लागणारी साधनसामुग्री व रासायनिक पदार्थाचा (वॉश) त्यात एकूण ५० प्लास्टिकचे ड्रम त्यामध्ये प्रत्येकी ड्रममध्ये २०० लिटर असा एकूण १०,००० लिटरचा साठा त्याची एकुण किमंत ५,००,०००/- रूपये. असा मुद्देमाल घटनास्थळी मिळुन आल्याने तो जागीच नष्ट करण्यात आला. सदरबाबत मानपाडा पो.स्टे.गु.र.नं. 47/2025 महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 (सी) (एफ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


२) घेसर गावाच्या शिवारात, एका वडाच्या झाडाखालील मोकळ्या जागेत, घेसर गाव, ता. कल्याण या ठिकाणी आरोपी नामे नंदजी बुद्ध यादव (वय: ५५ वर्षे), राहणार ठीकाण. सुकऱ्या पाटील चाळ, रू.नं. ०५, घेसर गाव, तालुका कल्याण, जि. ठाणे हा व त्याचे तीन साथीदार हे अवैधरित्या गावठी हातभट्टीची दारू तयार करीत होते व त्यासाठी लागणारी साधनसामुग्री व रासायनिक पदार्थाचा (वॉश) त्यात एकूण २५ प्लास्टिकचे ड्रम त्यामध्ये प्रत्येकी ड्रममध्ये २०० लिटर असा एकूण ५,००० लिटरचा साठा त्याची एकुण किंमत २,५०,०००/- रूपये असा मुद्देमाल घटनास्थळी मिळुन आल्याने तो जागीच नष्ट करण्यात आला. सदरबाबत मानपाडा पोलीस ठाणे 48/2025 महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 (सी) (एफ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी मा. श्री. आशुतोष डुंबरे साो, पोलीस आयुक्त, ठाणे शहर, मा. श्री पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, ठाणे शहर, मा. श्री. अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, ठाणे शहर व मा. श्री. शेखर बागडे, सहाय्यक पोलीस आयुक्त (शोध-१), गुन्हे शाखा, ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अजित शिंदे, सहा.पो.निरी. सर्जेराव पाटील, पोउपनिरी. विनोद पाटील, पोउपनिरी. किरण भिसे, सपोउपनिरी. दत्ताराम भोसले, बालाजी शिंदे, बोरकर, पोहवा.प्रशांत वानखेडे, सुधीर कदम, विजय जिरे, आदिक जाधव, विलास कडु, गोरक्षनाथ पोटे, भांगरे, खंदारे, सचिन कदम, सचिन भालेराव, पोना. दिपक महाजन, प्रविण किनरे, पोशि. विनोद चन्ने, गुरूनाथ जरग, सतिष सोनवणे, गोरक्ष शेकडे, गणेश हरणे, जालिदंर साळुंखे, मपोशि. मंगल गावित, सर्व नेम. गुन्हे शाखा, घटक-३, कल्याण यांनी यशस्वीपणे केली आहे.