प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण दि.२८ – कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिनांक २७/०१/२०२६ रोजी रात्रौ ०७:३० वाजता ते दिनांक २८/०१/२०२६ रोजी सकाळी ०८:०० वाजण्याच्या दरम्यान रिजेन्सी पार्क, चक्कीनाका कल्याण (पुर्व) येथे पार्क करून ठेवलेल्या आय-२० गाडी क्र. एमएच०५ सीव्ही-६४१० गाडीची कोणीतरी अज्ञात इसमाने काच फोडुन गाडीत ठेवलेला काळ्या रंगाचा डेल कंपनीचा लॅपटॉप चोरी केला. तसेच आजुबाजुच्या इतर पाच गाडयांच्या काचा फोडुन नुकसान केले बाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून कोळसेवाडी पोलीस ठाणे गुरजि.नं. ४८/२०२६ भा.न्या.स.२०२३ चे कलम ३०५ (ब), ३२४(४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर दाखल गुन्ह्याचा तपास मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहा पोलीस निरीक्षक संदिप भालेराव व त्याचे पथक असे करीत असताना सदर गुन्ह्याचे घटनास्थळी मिळुन आलेले सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे गुन्ह्यातील अज्ञात आरोपी निष्पन्न करून आरोपी नामे सुजल बाबासाहेब वाघचौरे (वय: २१ वर्षे), राहणार: दत्तु गायकवाड चाळ, रूम नं ३. गोसावीपुरा, चक्कीनाका, कल्याण (पुर्व) यास सदरचा गुन्हा घडल्यापासुन अवघ्या सहा तासात अटक करून गुन्ह्यातील चोरीस गेलेला १८,०००/- रू. किंमतीचा डेल कंपनीचा लॅपटॉप हस्तगत करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस उप आयुक्त, परीमंडळ ३, कल्याण श्री. अतुल झेंडे, व सहा. पोलीस आयुक्त कल्याण विभाग श्री. कल्याणजी घेटे यांचे मार्गदर्शनाखाली कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत गुरव व पोनि. गुन्हे गणेश न्हायदे यांचे सुचनेप्रमाणे सपोनि. संदिप भालेराव, पोहवा. विशाल वाघ, दत्तु जाधव, गोरखनाथ घुगे, रोहीत बुधवंत, विलास जरग, पोना. दिलीप कोती यांचे पथकाने केलेली आहे.