

प्रतिनिधी: अवधुत सावंत
ठाणे : मानपाडा पोलीस स्टेशन गुरजिनं ३४१/२०२५ बीएनएस कायदा कलम ६४, ७४, ११५(२), ३५१(२), ३(५) सह आर्म ऍक्ट कायदा कलम ३,२५ व टिळकनगर पोलीस स्टेशन गुरजिनं २६७/२०२५ भादंवि कलम ३७६ (२), (एन) ५०४, ५०६ प्रमाणे दाखल गुन्ह्यातील पाहीजे असलेला आरोपी सुरेंद्र पांडुरंग पाटील (वय: ५२ वर्षे), राहणार. चौधरी बिल्डिंग, २ रा माळा, बँक ऑफ महाराष्ट्र जवळ, बारा बंगला रोड, ठाकुर्ली, डोंबिवली (पुर्व) हा गुन्हे दाखल झाल्यापासुन फरार झालेला होता व सापडत नव्हता. सदर पाहीजे आरोपी सुरेंद्र पांडुरंग पाटील याचा गुप्त बातमीदारांकरवी शोध घेतला असता तो ‘हॉटेल सेलीब्रेशन’ जिल्हा नाशिक याठिकाणी लपुन बसला असल्याबाबत माहीती प्राप्त झाली होती.
सदर मिळालेल्या गुप्त माहितीच्या अनुषंगाने आरोपी सुरेंद्र पांडुरंग पाटील यांस इंदीरानगर पोलीस स्टेशन, नाशिक शहर यांच्या मदतीने खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे शहर यांनी ‘हॉटेल सेलीब्रेशन’ जिल्हा नाशिक येथुन दिनांक ०४/०४/२०२५ रोजी सायंकाळी ०८.०० वाजता पकडून ताब्यात घेतले असुन, त्यास पुढील तपासकामी मानपाडा पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे.

सदरची कारवाई मा. आशुतोष डुंबरे, पोलीस आयुक्त, ठाणे शहर, मा. डॉ. पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त, (गुन्हे), ठाणे शहर मा. अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त, (गुन्हे), ठाणे, मा. शेखर बागडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, शोध-१, गुन्हे शाखा, ठाणे तथा प्रभारी अधिकारी खंडणी विरोधी पथक मा. विनायक घोरपडे, सहायक पोलीस आयुक्त, शोध -२, गुन्हे शाखा, ठाणे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. नरेश पवार, सपोनि. सुनिल तारमळे, श्रीकृष्ण गोरे, पोउपनिरी. सुहास तावडे, सपोउपनिरी. संदीप भोसले, पोहवा. ठाकुर, पाटील, गायकवाड, जाधव, गडगे, मपोहवा. पावसकर, पोना. हासे, मधाळे, चापोना. हिवरे, पोशि. वायकर, ढाकणे यांनी यशस्वीपणे केली आहे.