साकीनाका पोलीसांची उल्लेखनीय कामगिरी
एस.डी चौगुले
दि. ६ जानेवारी रोजी रात्री ०२:४५ च्या सुमारास साकीनाका पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना ठाण्याच्या हद्दीत गस्त करत असताना एक विदेशी नागरिक संशयास्पद वावर करताना आढळला. त्याच्या चौकशीदरम्यान, ‘कोकेन’ अंमली पदार्थ असलेल्या ८८ कॅप्सुल असलेली पिशवी सापडली.
अधिक चौकशीत त्याने कोकेन सध्या साकीनाका येथील हॉटेलमध्ये राहणाऱ्या एका विदेशी नागरिकाकडून घेतल्याचे उघड झाले. अधिकाऱ्यांनी सापळा रचून इतर आरोपींनाही अटक केली.
९ कोटी रुपयांचे ८८० ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले असून दोन्ही परदेशी नागरिकांविरुध्द एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.