संदिप कसालकर
०२ जुलै २०२४ – मुंबई: देशभरात 1 जुलैपासून तीन नवीन फौजदारी कायदे लागू करण्यात आले आहेत. त्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS), भारतीय न्याय संहिता (BNS) आणि भारतीय पुरावा कायदा यांचा समावेश आहे. या मध्ये काही कलमे हटवण्यात आली असून काही नवीन कलम हि जोडण्यात आली आहेत. या बाबत जनजागृती व्हावी यासाठी मेघवाडी पोलिसांनी पोलीस ठाणे हद्दीतील मोहल्ला कमिटी, महिला दक्षता समिती, ज्येष्ठ नागरिक, शिक्षक यांच्या उपस्थितीत सभेचे आयोजन केले होते.
उपस्थितांना मेघवाडी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश मचिंदर, पोलीस निरीक्षक प्रशांत भरते (गुन्हे), महिला पोलीस निरीक्षक सिमा सकुंडे (जनसंपर्क), सहायक पोलीस निरीक्षक गुर्जर (का व सु) यांनी नवीन कायदे व कलमांविषयी माहिती दिली.
लहान मुलांवरील तसेच महिलांवरील होणारे गुन्हे यामध्ये काय तरतुदी केल्या आहेत याबाबत सुद्धा सखोल मार्गदर्शन केले. दरम्यान या संदर्भात उपस्थितांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरही मेघवाडी पोलिसांकडून देण्यात आली. या बाबतची माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी व जनजागृती करावी असेही आवाहन पोलिसांनी उपस्थितांना केली. या प्रसंगी २५ महिला तसेच पुरुष सदस्यांनी उपस्थिती दर्शविली.
या मार्गदर्शन सभेला मेघवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश मचिंदर यांच्यासोबत, पोनि प्रशांत भरते, मपोनि सिमा सकुंडे, सपोनि गुर्जर, पोउनि इंगळे, पोउनि बांदेकर, मिल्स स्पेशल, आदी उपस्थित होते.