लोकमान्य टिळक मार्ग सायबर पोलिसांनी केला खळ्खट्याक
भक्ती दवे
लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाणेच्या सायबर पथकाने एकाच तपास दौ-यात सेक्टटॉर्शन, ओएलएक्स फ्रॉड व टास्क फ्रॉड मधील आरोपीतांस मेवात (हरीयाना), कामां, भरतपुर (राजस्थान) व दिल्ली येथुन शिताफीने पकडुन एकुण पाच गुन्हे उघड केले आहेत.
लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाणे, दाखल सेक्सटॉर्शनच्या गुन्हयातील पाहीजे आरोपीतांनी फिर्यादी यांचा अश्लिल व्हिडीओ तयार करून सदर व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची वेळोवेळी धमकी देवुन फिर्यादी यांचेकडुन टप्प्याटप्प्याने एकुण रक्कम रु ५,१५,५५०/- दोन वेगवेगळया बँक खात्यांमध्ये भरून घेवुन पुढे झारा एन्टरप्रायझेसच्या नावाने असलेल्या खात्यातुन विड्रॉ केले म्हणुन गु.र.क्र.४३७ / २०२३ कलम ४१९,४२०,३८४, ५०६ भादंवि सह ६६क, ६६ ड आय.टी अॅक्ट अन्वये गुन्हा नोंद करून पाहीजे आरोपी नामे वकीम शाहुन खान व एजाज अहमद फैज मोहम्मद यांना गोपनिय व तांत्रिक माहीतीच्या आधारे शोध घेवुन सापळा रचुन मेवात, हरीयाना येथुन पकडण्यात आले व ट्रान्झिट रिमांड घेवुन मुंबईत आणण्यात आले.
तसेच अन्य एका गुन्हयात महीला फिर्यादी यांना त्यांनी ओएलएक्स पोर्टलवर विक्रीसाठी टाकलेले जुने कपडे व कानातल्या रिंग विकत घेण्याचा बहाणा करून त्यांचेकडुन एकुण रक्कम रू ३,६५,०००/- एवढी रक्कम भरून घेवुन फसवणुक केली म्हणुन गु.र.क्र. ४५९ / २०२३ कलम ४१९, ४२०, भादंवि सह ६६क, ६६ ड आय. टी अॅक्ट अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदर गुन्हयातील पाहीजे आरोपीत नरेंद्रसिंग राजेंद्रसिंग गुर्जर यास देखील तांत्रिक माहीतीच्या आधारे कौशल्यपुर्ण पदधतीने तहसील कामा, जिल्हा डिग, राजस्थान येथुन ताब्यात घेवुन त्याचे ट्रांझिट रिमांड घेवुन मुंबई येथे आणण्यात आले.
तसेच अन्य एका गुन्हयात महीला फिर्यादी यांना पैसे गुंतवणुक करून जास्त पैसे मिळवुन देण्याचे अमिष दाखवुन वेगवेगळया खात्यावर पैसे भरून घेवुन त्यांची रक्कम रू ८,२७,९९३ /- ची फसवणुक केली होती म्हणुन गु.र.क्र. ३५७/२०२३ कलम ४१९, ४२०, भादंवि सह ६६क, ६६ ड आय.टी अॅक्ट अन्वये गुन्हा नोंद करून सदर गुन्हयाचा देखील तांत्रिक पदधतीने कौशल्यपुर्ण तपास करून पाहीजे आरोपीत मोहम्मद सलिम मौज खान यास मेवात हरीयाना येथुन ताब्यात घेण्यात आले आहे.
तसेच लो. टि मार्ग पोलीस ठाणेचे गु.र.क्र. ३४ / २०२३ व गु.र.क्र.४२० / २०२३ या गुन्हयांतील आरोपीतांचा दिल्ली परिसरात शोध घेवुन नमुद दोन्ही गुन्हे देखील उघड करण्यात आले आहे.
तरी उपरोक्त नमुद गुन्हयांतील आरोपीतांचा कोणताही सुगावा नसताना तांत्रिक पदधतीने कौशल्यपुर्ण तपास करून लो. टि. मार्ग सायबर पथकाने १५ दिवस परराज्यात ( हरीयाना, राजस्थान व दिल्ली) राहुन नमुद आरोपीतांस पकडले व एकुण पाच क्लिष्ट गुन्हे उघड करण्याची कामगिरी केलेली आहे.
सदरची यशस्वी कामगिरी मा. अप्पर पोलीस आयुक्त (दक्षिण प्रादेशिक विभाग) डॉ. श्री. अभिनव देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त (परिमंडळ ०२) श्री. मोहित कुमार गर्ग, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त (पायधुनी) श्रीमती ज्योत्स्ना रासम यांच्या मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वाघ यांच्या नेतृत्वात पो.नि कैलास करे व सायबर गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि प्रकाश पाटील, पोउपनि सचिन शेळके, पो.ह.क्र.३२११६ / देसाई, पो.ह.क्र.०५०८९३ / संतोष पवार, पो.शि.क्र.११३१९७ / गणेश पवार, पो.शि.क्र. १४०१७२/ निलेश झगडे, पो.ह. क्र. ०३ – ०५०५ मुन्ना सिंग व पो. ह. क्र. ०६-०७२१शैलेश पाटील (परि ०२ कार्यालय) यांनी पार पाडली आहे व भविष्यातही अशीच कामगिरी पार पाडण्याचे योजीले आहे.