![](https://maharashtrapolicenews.com/wp-content/uploads/2023/10/govandi-police.jpg)
३ आरोपींसह ३ विधिसंघर्षग्रस्त बालक गोवंडी पोलिसांच्या ताब्यात
![](https://maharashtrapolicenews.com/wp-content/uploads/2023/10/govandi-police-1024x573.jpg)
सलाहुद्दीन शेख
गोवंडी पोलीसांनी अनोळखी मृतदेहाची ओळख पटवून प्रेमविवाहातून झालेल्या २ खुनांचा उलगडा करून ३ आरोपीतांस अटक व ३ विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले आहे.
दिनांक १४/१०/२०२३ रोजी गोवंडी पोलीस ठाणे हद्दीत अंदाजे २० ते २२ वर्षीय अनोळखी इसमाचा मृतदेह मिळून आला. सदर घटनेबाबत गोवंडी पोलीस ठाणेस अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली.
सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ६, मुंबई यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोवंडी पोलीस ठाणे यांनी दहा तपास पथके तयार केली. नमुद पथकाने कौशल्यपूर्ण तपास करीत मयताची ओळख पटविली. मयत इसम करण रमेश चंद्र, वय २२ वर्षे हा उत्तरप्रदेश येथील रहिवाशी असल्याचे निष्पन्न झाले. सदर प्रकरणी गोवंडी पोलीस ठाणेस कलम ३०२, २०१ भादवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. तपास पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे अधिक तपास करीत मयत इसमाचे पत्नीचे वडिल गोरा रईमुद्दीन खान, वय ५० वर्षे यास संशयाच्या आधारावर ताब्यात घेतले.
संशयित इसमाकडे विचारपुस तंत्राचा वापर करून अधिक तपास केला असता त्याने मुलगा नामे सलमान गोरा खान, वय २२ वर्षे व अन्य साथीदार यांचे मदतीने खुन केल्याचे सांगितले. आरोपीताची मुलगी गुलनाज व तिचा पती करण यांचा मागील वर्षी प्रेमविवाह झाला होता त्या रागातून दोघांचाही खून केल्याची माहिती आरोपीने दिली. आरोपीने दाखविलेले ठिकाण नवी मुंबई येथून मयत गुलनाज हिचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला आहे.
गोवंडी पोलीसांनी गुन्हयाच्या तपासामध्ये अद्यापपर्यंत गोरा रईमुद्दीन खान, वय ५० वर्षे, त्याचा मुलगा सलमान गोरा खान, वय २२ वर्षे, सलमान याचा मित्र मोहम्मद कैफ नौशाद खान यांना अटक केली असून विधीसंघर्षग्रस्त बालकांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे. नमुद गुन्हयाचा पुढील तपास पोनि अनिल हिरे करीत आहे.
सदरची कामगिरी मा. अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, श्री विनायक देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त, श्री हेमराजसिंह राजपूत, सहायक पोलीस आयुक्त, चेंबूर विभाग, श्री जगदेव कालापाड यांचे मार्गदर्शनाखाली श्री सुदर्शन होनवडजकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गोवंडी पोलीस ठाणे, मुंबई यांचे नेतृत्वाखाली गोवंडी, ट्रॉम्बे, टिळकनगर, चेंबूर व शिवाजीनगर पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी व पथक यांनी केलेली आहे.