४ आरोपी एम.एच.बी पोलिसांच्या ताब्यात
संदिप कसालकर
दि. १४-१०-२०२३ बोरिवली येथे नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या गरबा रास कार्यक्रमात बनावट प्रवेशिका देऊन आर्थिक फसवणूक झाल्याची तक्रार एम.एच.बी पोलीस ठाण्यात दाखल झाली असता व.पो.नि. सुधीर कुडाळकर यांनी तात्काळ पथक नेमून ४ आरोपींना ताब्यात घेतले व त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. तपासादरम्यान 30 लाख रुपये किमतीचे 1000 पास, 5 लाख किमतीचे लॅपटॉप, प्रिंटर आणि इतर साहित्य अशी एकूण ३५,१०,००० रुपयांची मालमत्ता हस्तगत करण्यात आली.