सलाहुद्दीन शेख
नाशिक येथे ३०० कोटींच्या मेफेड्रोन (एम.डी.) टोळीचा पर्दाफाश केल्यानंतर, आज साकीनाका पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी फरार असलेल्या अंमली पदार्थ टोळीच्या प्रमुखाला अटक केली. आतापर्यंत १५ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर विविध एन.डी.पी.एस. कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर आणि विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी या मोठ्या यशाबद्दल संपूर्ण तपास पथकाचे अभिनंदन केले आहे.
नाशिक येथे एकूण ३०० कोटी २५ लाख १० हजार रुपये किमतीचे १५१.३०४ किलो एम.डी. या अंमली पदार्थांचे निर्मितीचे साहीत्य तसेच रसायने जप्त करण्यात आली होती.