सलाहुद्दीन शेख
मुंबई विमानतळ पोलिसांकडून, उल्लेखनीय कामगिरी पाहायला मिळाली,
उत्तर प्रदेश येथील,अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश, हे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, टर्मिनल १ येथे टॅक्सीतून येत असताना ,त्यांचा मोबाईल टॅक्सीत विसरले होते. त्यांनी मुंबई पोलिसांच्या संकेतस्थळावर ऑनलाईन तक्रार नोंदवली असता ,विमानतळ पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी ,त्वरित टॅक्सी चालकाशी संपर्क करून, टॅक्सी चालकाकडून सदर मोबाईल, विमानतळ पोलिस ठाणे येथे ज़मा करण्यात आले.
या कर्तव्यतत्परतेसाठी ,त्यांनी सर्व पोलीस अधिकारी, व कर्मचाऱ्यांचे कौतुक करुन, त्यांचे आभार मानले .