संदिप कसालकर

‘नारपोली, कोनगांव व पडघा या भिवंडी ग्रामीण परिसरात घरफोडी / वाहन चोरी करणाऱ्या टोळीतील ०३ सदस्यांना अटक करण्यात आली आहे तसेच १० गुन्हे उघडकीस आणुन एकुण ३९,४०,८१३/- रू. किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.


वरिष्ठांच्या सूचना:
मागील काही दिवसामध्ये नारपोली पोलीस ठाण्याचे हद्दीतील माल वाहतुक करणारे वाहनाची चोरी व सदरचे चोरीचे वाहन वापरून घरफोडी चोरी करण्याचे गुन्हयामध्ये वाढ झाली होती. त्याअनुषंगाने अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, ठाणे व पोलीस उप आयुक्त, गुन्हे, ठाणे यांनी अशा प्रकारचे गुन्हयांना आळा घालणेकामी व घडलेले गुन्हे उघडकीस आणणेबाबत सुचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे, (शोध – १ ), ठाणे यांच्या सुचनेप्रमाणे गुन्हे शाखा घटक २, भिवंडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांनी विशेष पथक स्थापन केले.

पोलिसांची कारवाई व आरोपींचा तपशील:
सदर पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल / ४२४८ अमोल देसाई यांना मिळालेल्या बातमीच्या आधारे आरोपी नामे –
१) शिवमंगल इश्वरदिन मिश्रा उर्फ सागर, वय ४० वर्षे, सध्या रा. म्हलोत्रा कंम्पाउंड, भाडयाची खोली, स्वयंम सिद्धी कॉलेजच्या समोर, कल्याण रोड, टेमघर, भिवंडी, जि. ठाणे
२) शफातउल्लाह इस्तीयाक चौधरी उर्फ इरफान, वय ४५ वर्षे, रा. ठि. सध्या रा. म्हलोत्रा कंम्पाउंड, भाडयाची खोली, स्वयंम सिद्धी कॉलेजच्या समोर, कल्याण रोड, टेमघर, भिवंडी, जि. ठाणे,
३) अमान फुरकान खान, वय ३० वर्षे, सध्या रा. रूणावल माय सिटी, टॉवर नंबर 3 / ४, रूम नंबर २२०३, मानपाडा – दिवा रोड, बेतवडे गांव, ता. कल्याण, जि. ठाणे यांना अटक करण्यात आली आहे.

उघडकीस आलेले गुन्हे व हस्तगत मालत्तेची माहिती:

पाहीजे आरोपी यांचा शोध सुरू असुन त्यांचा शोध घेवुन उर्वरीत चोरीस गेलेली मालमत्ता हस्तगत करण्याची तजविज ठेवली आहे.

यशस्वी कामगिरी:
सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, घटक २, भिवंडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड, सपोनि / श्रीराज माळी, सपोनि / धनराज केदार, सपोउपनि / राजेश शिंदे, पोहवा / सुनिल साळुंखे, मंगेश शिर्के, रंगनाथ पाटील, प्रकाश पाटील, सचिन साळवी, साबीर शेख, वामन भोईर, अमोल देसाई, पोना / सचिन जाधव, पोशि/ भावेश घरत यांनी केली आहे.