एस.डी चौगुले

११० वाहनांच्या मालकांचा पोलीस घेत आहेत शोध रांजणगाव एम.आय.डी.सी पोलीस स्टेशन / गंगामाता वाहन शोध संस्थेचा उपक्रम / व जाहीर आवाहन.

रांजणगाव एम.आय.डी.सी पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये खुप दिवसापासुन बरेच दुचाकी व चारचाकी वाहने ही धुळखात पडलेली आहेत. वाहन निर्गती न झालेने परिणामी वाहनांचे ऊन पाऊस यामुळे नुकसान होवून मुळ मालकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागून पोलीस ठाण्याचे आवारामध्ये वाहने पडून राहील्याने पोलीस स्टेशनच्या सुशोभिकरणात बाधा निर्माण होवुन बकालपणा निर्माण होतो या कारणाने अशा वाहनांची विल्हेवाट लावणे गरजेचे असते. व पोलीस स्टेशन कडील दुचाकी व चारचाकी वाहन निर्गती बाबत वेळोवेळी वरीष्ठ कार्यालयाकडून सुचना येत असतात.

त्या अनुशंगाने रांजणगाव एम.आय.डी.सी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण आणि पुण्यातील मावळ भागातील परदंवाडी येथील गंगामाता वाहन शोध संस्था यांनी या बेवारस वाहनांच्या मुळ मालकांचा शोध घेवुन सदरची वाहने ही मुळ मालकांच्या ताब्यात देण्याची शोध मोहिम हाती घेतली आहे. पुणे ग्रामीण जिल्हयाचे पोलीस अधिक्षक,अंकीत गोयल सोो. यांच्या आदेशानुसार तसेच अपर पोलीस अधिक्षक ,मितेश गटटे व शिरूर उपविभागीय पोलीस अधिकारी , यशवंत गवारी यांच्या मार्गदर्शनाखाली अशा बेवारस वाहनांच्या मुळ मालकांना शोधण्याची युद्ध पातळीवर शीघ्र मोहिम सुरु केली आहे.

कशी असते ही प्रक्रिया

पोलीस स्टेशन आवारामधील या बेवारस वाहनांच्या चेशी नंबर व इंजीन नंबर यांच्यावरुन जिल्हा परीवहन कार्यालय यांचे मदतीने मुळ मालकाची माहिती गोळा केली जाते. या माहितीच्या आधारे मुळ मालकाचे नाव, पत्ता, अशी माहिती प्राप्त होते. त्यानुसार या मालकांना त्यांच्या मुळ पत्त्यावर रजिस्टर पोस्टाने पत्रव्यवहार करुन आपले वाहन १५ दिवसाच्या आत घेवुन जाण्याचे आवाहन केले जाते. त्याकरिता वाहन ताब्यामध्ये घेण्या करीता येताना मुळमालकांचा स्वतःचा फोटो असलेले ओळखपत्र, तसेच वाहन संदर्भात आवश्यक ती कागदपत्रे सोबत बाळगणे आवश्यक असते. मुळ मालक मुदतीमध्ये वाहन घेण्यास आले नाहीत तर सदर वाहने हे बेवारस असल्याचे समजुन सरकारी लिलाव प्रक्रिया पूर्ण करुन पुढील कारवाई केली जाते. व त्या लिलावामधुन आलेली रक्क्म ही सरकारी तिजोरीमध्ये भरणा केली जाईल अशी माहिती रांजणगाव एम.आय.डी.सी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश कृष्णराव ढवाण यांनी दिली आहे.

सर्व नागरीकांना आपली दुचाकी व चारचाकी वाहने घेवून जाणे बाबत आवाहन केले आहे सदर कामी पो. उप निरीक्षक-सुहास रोकडे, सहा. फौजदार – दत्तात्रय शिंदे, पो. हवा/१८८१ विलस आंबेकर, पो.हवा / २१६९ माणिक काळकुटे, पो.कॉ/२८१७ उमेश कुतवळ, पो.कॉ/२८४१ विजय शिंदे यांचेसह गंगामाता वाहन शोध संस्थेचे अध्यक्ष राम उदावंत व उपाध्यक्ष बाबासाहेब बागडे यांनी परीश्रम घेऊन मात्र दोनच दिवसात 110 वाहनाचा तपास लावण्यात आला आहे …