जोगेश्वरी: कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अहोरात्र मेहनत करणाऱ्या पोलीस दलाचा सन्मान हा समाजासाठी प्रेरणादायी ठरतो. याच उद्देशाने पत्रकार संदीप कसालकर यांनी मेघवाडी पोलीस ठाण्याचे इन्चार्ज प्रदीप यादव, तसेच कर्तव्यदक्ष अधिकारी बालाजी जाधव आणि वाकडे यांचा त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल सत्कार केला.

सत्कार कार्यक्रमात गुलाबाचे फूल आणि पुष्पगुच्छ देऊन अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना संदीप कसालकर म्हणाले, “पोलिसांचे कार्य हे केवळ प्रशंसेपुरते मर्यादित नसून, समाजासाठी प्रेरणादायक आहे. त्यांचा आदर आणि सन्मान करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.”

पोलिसांच्या कामगिरीला दिलेली ही दाद अधिकाऱ्यांसाठी उत्साहवर्धक ठरली असून, नागरिक आणि पोलिसांमधील सकारात्मक संबंध अधिक मजबूत करण्याचा संदेश या कार्यक्रमाने दिला आहे.