सलाहुद्दीन शेख
वाडा येथील भारतीय कामगार सेनेच्या अधिपत्याखाली असलेल्या कंपन्याना भेट व निर्धार मेळावा
ठाणे जिल्ह्यातील वाडा येथील भारतीय कामगार सेनेच्या अधिपत्याखाली असलेल्या हिंदुस्थान कोका-कोला बेव्हरेजेस प्रा. लि., ब्लू स्टार लि., हर्मिनो इंडिया प्रिसिजन टेक्नॉलॉजी प्रा. लि., दिवेकर वॉलस्टेब ॲण्ड श्नाइडर प्रिसिजन सील्स प्रा. लि. आणि सेंट गोबिन कंपनी
अशा सर्व कंपन्यांमध्ये भा.का.सेनेचे संयुक्त सरचिटणीस श्री.संजय शंकर कदम व पदाधिकारी यांनी प्लॅंटला भेटी देऊन कामगार व मॅनेजमेंट यांच्याशी सुसंवाद साधला.आणि कामगारांना कामाच्या ठिकाणी भेडसावत असलेल्या समस्या जाणून घेतल्या.
यावेळी त्या त्या कंपनींचे मॅनेजमेंट, कमिटी सदस्य व कामगार बहूसंख्येनी उपस्थित होते. त्यानंतर सायंकाळी ०७ वाजता कंटाल येथील पुजा फार्म हाऊस येथे निरधार मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याला मार्गदर्शन करताना ,
संजय कदम यांनी वाडा परिसरात मोठ्याप्रमाणात कंपन्या असताना आणि भा.का.सेना असलेल्या युनिटला चांगल्या प्रकारे न्याय देत असताना युनिट वाढत का नाहीत आपण कुठे कमी पडतो याचे आत्मपरिक्षण करण्यास सांगितले व त्यासाठी काही सूचना असतील तर तसे आपण सांगितल्यास नक्की त्याचा विचार केला जाईल व कार्यपध्दतीत बदल केला जाईल अशी ग्वाही दिली.
प्रथमच असा मेळावा आयोजित केल्यामुळे कामगारांनी आनंद व्यक्त केला, व युनिट वाढविण्याचा निर्धार केला. याप्रसंगी चिटणीस संतोष कदम, मयूर वनकर, सुर्यकांत पाटील, राजा ठाणगे, सहचिटणीस दिनेश पाटील, संदीप पाटील,
मिलिंद तावडे, विजय शिर्के, कार्यकारीणी सदस्य ज्ञानेश्र्वर ठाकरे(सरपंच), किरण भोईर, योगेश ठाकरे, किरण मालप आणि युनिटचे अध्यक्ष विवेक पाटील (कोका कोला), स्वप्निल पाटील (दिवेकर वॉलस्टेब), किरण मालप (ब्ल्यू स्टार), संदीप पाटील
(हरमिनिओ) इतर सर्व कमिटी सदस्य व कामगार उपस्थित होते. या सर्व मेळाव्याचे आयोजन सहचिटणीस श्री.दिनेश पाटील, ज्ञानेश्वर ठाकरे, किरण भोईर व योगेश ठाकरे यांनी केले.