हरियाणाच्या पलवलमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. कायद्याच्या रक्षकांनीच एका महिलेची अब्रू लुटली आहे. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर त्यांनी त्या विवाहितेला दुसऱ्याला विकून टाकले आहे. पतीविरोधात तक्रार देण्यासाठी ही महिला पोलीस ठाण्यात आली होती. तिच्यावर पोलीस सब इन्स्पेक्टर आणि त्याच्या मित्रांनी बलात्कार केला आहे.
आरोपींनी तिला तीन दिवस एका घरात बंद करून ठेवले होते. तिथे तिच्यावर आळीपाळीने बलात्कार करण्यात आला. यानंतर आरोपींनी तिला अन्य एका व्यक्तीला विकले. त्यानेही तिच्यावर बलात्कार केला. रविवारी हा प्रकार उघड झाला आणि खळबळ उडाली होती. हसनपूर पोलीस ठाण्यात पीएसआय आणि अन्य सात लोकांवर एफआयआर नोंद करण्यात आला आहे.
महिलेला एका आरोपीचा फोन सापडला, यामुळे तिने फोनवर पोलिसांना ही माहिती दिली. यामुळे तिची सुटका करण्यात आली. पोलिसांनी महिलेला तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिले असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. ही महिला 23 जुलै रोजी हसनपूर पोलीस ठाण्यात आली होती जिथे तिची आरोपी उपनिरीक्षक शिवचरणशी भेट झाली होती. त्याने तक्रार नोंदविण्यास नकार दिला होता. शिवचरणने तिला जवळच्या शेतात जाण्यास भाग पाडले, तिथे त्याचे तीन मित्र होते. तिघांनीही तिच्यावर बलात्कार केला आणि तिचा अश्लील व्हिडिओही बनवला. त्या व्हिडीओच्या जोरावर तिला एका घरात घेऊन गेले आणि तिच्यावर तिथेही आळीपाळीने बलात्कार केला.
दुर्दैवी! पतीविरोधात तक्रार द्यायला गेली महिला, पोलिसांनीच अब्रू लुटली व तिला विकून टाकले
Related Posts
डोंबिवली वाहतूक शाखे तर्फे महात्मा गांधी विद्यामंदिर डोंबिवली येथे ३५ वे रस्ता सुरक्षा अभियान संपन्न..
प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवली : डोंबिवली वाहतूक शाखे तर्फे दि. ०९/०१/२०२५ रोजी, डोंबिवली पश्चिम येथे रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत महात्मा गांधी येथील विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा विषयी मार्गदर्शन करण्यात आले. डोंबिवली…
महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे अंतर्गत परिमंडळ-३, कल्याण मध्ये मुददेमाल हस्तांतरण व ‘सीएमआयएस’ ऍप चे अनावरण..
प्रतिनिधी: अवधुत सावंत कल्याण : महाराष्ट्र पोलीस दलाचे स्थापनेचे औचित्य साधुन दिनांक ०२ जानेवारी ते ०८ जानेवारी २०२५ दरम्यान ‘पोलीस रेझिंग डे सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने दिनांक ०८/०१/२०२५…