संदिप कसालकर

सन २०२० मध्ये पार पडलेल्या जगातील अतिशय खडतर कॉम्रेड्स मॅरेथॉन स्पर्धेत लागोपाठ मेडल प्राप्त करणारे आणि महाराष्ट्र पोलीस दलाचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजवणारे मुंबई पोलीस दलातील डी.एन. नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वाहिद पठाण यांनी पुन्हा एकदा कॉम्रेड्स मॅरेथॉन स्पर्धा २०२४ मध्ये बाजी मारली आहे.

वाहिद पठाण यांनी दिनांक ९ जून २०२४ रोजी झालेल्या स्पर्धेत ८५.९१ कि.मी. ची मॅरेथॉन स्पर्धा ११:४० मिनिटांत म्हणजेच दिलेल्या वेळेपेक्षा वीस मिनिटे लवकर पूर्ण केली आहे. त्यामुळे वाहिद पठाण हे मुंबई पोलीस दलात स्पर्धा पूर्ण करणारे प्रथम तर महाराष्ट्र पोलीस दलातील ३ क्रमांकाचे अधिकारी ठरले आहेत.
त्यांच्या या कारकिर्दीमुळे देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे.