प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण – दिनांक १२/०२/२०२६ रोजी रात्रौ १०:०० वाजता ते दिनांक १३/०२/२०२६ रोजी सकाळी ०९:०० वाजता च्या दरम्यान पत्रीपुल जवळील सार्वजनिक शौचालयाचे बाजुला कल्याण (पुर्व) येथे सार्वजनिक रोड लगत इसम नामे-सलमान जाहीद सि‌द्दीकी (वय:२१ वर्षे) धंदा: रिक्षाचालक, राहणार: वाघमारे चौरे चाळ, रूम नं.८१, गफर डॉन स्कुलचे समोर, पत्रीपुल जवळ, कल्याण (पुर्व) यांनी त्यांची ७०,०००/-रू. किंमतीची सुझुकी कंपनीची एव्हीनेक्स मोटरसायकल MH-05/FU-0658 ही पार्क करून ठेवली असता, ती कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी करून नेली असल्याची म्हणुन तकार दिल्याने कोळसेवाडी पोलीस ठाणे, गु.रजि नं.८०/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यातील संशयीत आरोपी हे सुचक नाका परिसरात फिरत असल्याची पोहवा. विशाल वाघ यांना बातमी मिळाल्याने, लागलीच पोलीस पथक रवाना होवुन, संशयीत आरोपींचा शोध घेत असताना, संशयीत आरोपी १) आशु संतोष सिंग (वय: २३ वर्षे), राहणार: रूम नं.०३, मातृ छाया बंगला, विठ्ठल मंदीराजवळ, सोनारपाडा, डोंबिवली (पूर्व),
२) अमन राधेश्याम जयस्वाल (वय: २३ वर्षे), राहणार: रूम नं.०२, दयानंद ठाकुर चाळ, हनुमान मंदीराजवळ, सोनारपाडा, डोंबिवली (पूर्व) हे प्रबोधनकार शाळेच्या मागे, नेतीवली, कल्याण (पुर्व) येथे सापडल्याने, त्यांना नमुद गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मोटारसायकलसह ताब्यात घेण्यात आले आहे.

नमुद आरोपी यांना अटक करून, त्यांच्याकडे अधिक तपास करता, त्यांनी १) हिललाईन पो. ठाणे, गु.र.नं.५०८/२०२५ भा.न्या.सं. २०२३ चे कलम ३०३(२) प्रमाणे, २) राबोडी पो.ठाणे.गु.र.नं.३९१/२०२५ भा.न्या.सं.२०२३ चे कलम ३०३(२) प्रमाणे दाखल एकुण ०३ गुन्हे उघडकीस आणले असुन, त्यांच्याकडुन सदर गुन्ह्यातील चोरीची १) ७०,०००/- रू किंमतीची सुझुकी कंपनीची एव्हीनेक्स मोटरसायकल MH- 05/FU-0658,
२) ९०,०००/-रू किंमतीची सुझुकी कंपनीची काळया रंगाची ऍक्सेस १२५ स्कूटर क्रमांक MH-05/BG-2881,
३) १,८०,०००/-रू किंमतीची बजाज कंपनिची काळया रंगाची रिक्षा क्रमांक MH-04/LX-2738 अशी एकूण ३,४०,०००/- रू. किंमतीची चोरीची वाहने हस्तगत करण्यात आलेली आहेत. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवा. विशाल वाघ, कोळसेवाडी पोलीस ठाणे हे करत आहेत.

सदरची कामगिरी मा. पोलीस उप आयुक्त साो, परिमंडल-३ कल्याण, अतुल झेंडे, सहा पोलीस आयुक्त, कल्याण विभाग, कल्याणजी घेटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हेमंत गुरव, पोलीस निरीक्षक (गुन्हे), गणेश न्हायदे कोळसेवाडी पोलीस ठाणे, यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. संदिप भालेराव, पोहवा. विशाल वाघ, गोरखनाथ घुगे, सचिन आव्हाड, दत्तु जाधव, पोना. दिलीप कोती, पोशि. राहुल खरे यांनी यशस्वीरित्या केलेली आहे.