एस. डी. चौगुले

नांदेड येथील शासकीय रुग्णालयामध्ये 24 तासात 24 मृत्यू प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करून दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसे जिल्हाध्यक्ष मॉन्टीसिंग जहागीरदार यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे केली आहे
नांदेड येथील विष्णुपुरी स्थित डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणावर गरीब रुग्ण उपचारासाठी बाहेर उपचार घेण्याची कुवत नसल्याने शासकीय रुग्णालयामध्ये येत असतात नांदेड येथील शासकीय रुग्णालयामध्ये 24 तासात 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याची अत्यंत खळबळजनक घटना घडली असून राज्यासह नांदेड येथील शासकीय रुग्णालयात औषधाचा प्रचंड मोठ्या प्रमाणात तुटवडा असल्याने अत्यवस्थ असलेल्या रुग्णांना वेळेवर योग्य असा औषध उपचार मिळाला नसल्याने 24 बालकांना व नागरिकांना जीव गमवावा लागला असल्याचाही आरोप जहागीरदार यांनी केले आहे
ठाणे जिल्ह्यातील महापालिकाकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात 18 रुग्णांचा उपचार अभावी मृत्यू झाला ही घटना ताजी असताना नांदेड येथील शासकीय रुग्णालयामधील अधिकारी यांच्या बेशिस्त व जबाबदार अधिकारी निष्काळजीपणामुळे निष्पाप लोकांच्या मृत्यूचे तांडव घडले असून तसेच रुग्णांना शासकीय रुग्णालयात चालू असलेला मोठ्या प्रमाणावर भ्रष्टचार सुरू असल्याचाही आरोप जहागीरदार यांनी केला आहे
औषधी पासून ते रक्त तपासण्या एम.आर.आय. सिटीस्कॅन सर्व तपासण्या बाहेरून करून रुग्णांची आर्थिक लुबाडणूक करीत असल्याचा आरोपही जहागीरदार यांनी निवेदनाद्वारे केला आहे
नांदेडच्या शासकीय रुग्णालयात गंभीर घटना घडली असून यास जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्याची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष मॉन्टीसिंग जहागीरदार यांनी निवेदनाद्वारे दिला आहे यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष विनोद पावडे रवी राठोड मनसे शहराध्यक्ष अब्दुल शफिक मनसे मनसे वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष संतोष सुनेवाढ विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष दीपक स्वामी अनिकेत परदेशी शंकर पाटील हाडोळीकर दिलीप राठोड राम जाधव संघरत्न जाधव चंद्रकांत नागुल राहुल शिंदे आधी मनसे मनसे पदाधिकारी उपस्थित होते