
प्रतिनिधी: अवधुत सावंत
ठाणे – नौपाडा पोलीस स्टेशन गु.र.नं. १३/२०२६ भा.न्या.सं. कलम ३०५ (ए), ३३१ (४), ३(५), ६२ मधील फिर्यादी नामे अनिल सखाराम परबळकर यांचे ‘अर्थव मेडीकल शॉप’ तसेच इतर ०५ दुकानांचे शटर उचकटुन कोणीतरी अज्ञात चोरट्याने मोबाईल व रोख रक्कम चोरी केली होती. सदर गुन्ह्याचा मालमत्ता गुन्हे कक्ष, गुन्हे शाखा यांनी समांतर तपास करून गुप्त बातमीदाराकडून तसेच घटनास्थळावरील सी.सी.टी.व्ही. फुटेजचे तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुन्ह्यातील अज्ञात आरोपी निष्पन्न करून सदर नमुद गुन्ह्यात अटक करण्यात आली.
१) विनयकुमार कृपाशंकर पासवान (वय २१ वर्षे), राहणार: आझादनगर, निजाम बिल्डिंग जवळ, झोपडपट्टी, सोनू पालची खोली, उल्हासनगर क्रमांक २, जि. ठाणे,
२) प्रदिप रामबहादुर निशाद (वय: २० वर्षे) राहणार: आझादनगर, निजाम बिल्डींग जवळ, झोपडपट्टी, उल्हासनगर नं.२, जि. ठाणे,
३) राजविर संजूसिंग लाहोरी (वय: १९ वर्ष), राहणार: सेन्ट्रल हॉस्पीटल एरीया, तेग बहादुर कॉलनी, उल्हासनगर नं.३, जि. ठाणे, (बिलीमोरा गुजरात येथून ताब्यात)
४) सलमान अली अहमद अली शेख (वय: २२ वर्षे), राहणार: पंजाबी कॉलनी, कविता मेडीकल जवळ, उल्हासनगर नं.३, जि. ठाणे, (देहुरोड पुणे येथून ताब्यात)
सदर आरोपी यांच्याकडे केलेल्या कौश्यल्यपूर्ण तपासात त्यांनी साथीदारसह ठाणे शहर, ठाणे ग्रामिण, मुंबई शहर व कोल्हापूर याठिकाणी घरफोडीसह एकुण १८ गुन्हे केल्याचे उघड झाले आहे.
गुन्ह्याची पध्दत – रिक्षा, दुचाकी चोरी करून त्याचा वापर गुन्हे करण्यासाठी करून किराणा दुकान व मेडीकल शॉपचे शटर उचकटून घरफोडी चोरी करणे. आरोपी सद्या टिळकनगर पोलीस कोठडीत आहेत. सदर आरोपींकडून तपासादरम्यान १,२५,०००/- रू. किंमतीचे वेगवेगळया कंपनीचे ०६ मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले आहेत.
सदरची कामगिरी ही श्री. अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त गुन्हे, ठाणे, श्री. विनय घोरपडे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे, शोध-२, गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता गुन्हे कक्षाचे वपोनिरी. गोरखनाथ घार्गे, मपोउनि. शितल पाटील, पोउनि. संजय भिसे, सपोउनि. शिवाजी गायकवाड, पोहवा. दिनेश कुंभारे, जयकर, जाधव, प्रशांत भुर्के, संदीप भांगरे, महेश साबळे, राहुल शिरसाठ, पोना. सचिन वानखेडे, सचिन कोळी, तौसीफ सैयद, पोअं. महेश सावंत, चापोअं. सदन मुळे, तसेच मपोहवा. आशा गोळे, मपोना. गिताली पाटील यांनी केलेली आहे.