एस.डी चौगुले
नांदेड दिनांक 4 11 2023 नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका अंतर्गत दिनांक 4 सप्टेंबर 2023 रोजी दिलेल्या पदभरती जाहिराती नुसार NUHM अंतर्गत निवड करण्यात आलेल्या लॅब टेक्निशियन (प्रयोग शाळा तंत्रज्ञ् )पदाकरिता झालेल्या
नियमबाह्य व चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेल्या निवड प्रक्रियेची उच्चस्तरीय चौकशी करून पात्र उमेदवारांना डावलून अपात्र उमेदवारांची निवड संगणमताने करणाऱ्या संबंधित निवड समितीचे अध्यक्ष, निवड समितीचे सर्व सदस्य व अपात्र असताना देखील पात्र करण्यात आलेल्या उमेदवारांवर कायदेशीर कार्यवाही करून फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष मॉन्टी सिंग जहागीरदार यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे केली आहे
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिके कडून एन यु एच एम अंतर्गत पद भरती करिता संदर्भ क्रमांक 1 अन्वये दिनांक 4 सप्टेंबर 2023 रोजी काही नियम व अटींच्या अधीन राहून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. सदर जाहिरातीतील नियम व अटी क्रमांक 7 व 10 नुसार लॅब टेकनिशीयन (प्रयोगशाळा तंत्रज्ञ् )ह्या पदा करिता तत्सम कौन्सिलिंगचे रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक होते.
अन्यथा संबंधित उमेदवारास सदरील पदभरतीत अपात्र ठरविण्यात येईल, असे जाहिरातीतील नियम व अटी मधे नमूद असताना देखील शासनाचे नियम धाब्यावर बसवून, नियमबाह्य रित्या भरती प्रक्रियेत कौन्सिल चे रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र नसताना अपात्र उमेदवारांना निवड समिती कडून पात्र करण्यात असल्याचाही आरोप जहागीरदार यांनी केला आहे
सदरील निवड ही नियमबाह्य रित्या करण्यात आली आहे. नांदेड वाघाळा शहर महानगर पालिके कडून पदभरती करिता प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीतील अटी व शर्ती क्रमांक 7 व 10 चे उल्लंघन करून निवड समिती चे अध्यक्ष तथा आयुक्त साहेब, मनपा नांदेड, निवड समिती सदस्य सचिव तथा वैद्यकीय आरोग्य अधिकारी, मनपा नांदेड, निवड समिती सदस्य तथा माता बालसंगोपन अधिकारी, मनपा नांदेड, निवड समिती सदस्य तथा शहर कार्यक्रम व्यवस्थापक मनपा नांदेड, निवड समिती सदस्य तथा विषयतज्ञ मनपा नांदेड सह ज्या अपात्र उमेदवारांना पात्र करण्यात आले असे सर्व उमेदवार ह्या सर्वांनी संगणमताने नियमबाह्य रित्या अपात्र उमेदवारांना पात्र दाखवण्यात आले. सदरील निवड ही सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय क्रमांक पदभ 2021/प्र. क्र.652/सेवा -5 दिनांक 4/08/2021 नुसार चुकीची व नियमबाह्य पद्धतीने करण्यात आलेली निवड असल्याचेही जहागीरदार निवेदनात नमूद केले आहे
सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन निर्णय क्रमांक प.द.म. 2021/ प्र क्र 652 / सेवा 5 दिनांक 4 ऑगस्ट 2021 नुसार प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी व प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदाकरिता उमेदवाराकडे महाराष्ट्र पैरा वैद्यकीय परिषदेची नोंदणी करणे आवश्यक असून नोंदणी प्रमाणपत्र असणे अनिवार्य असताना दिनांक 26/09/ 2023 रोजी नांदेड वाघाळा शहर महानगर पालिका येथे करण्यात आलेल्या पदभरती प्रक्रियेत निवड करण्यात आलेल्या खुल्या प्रवर्गातील तिन्ही निवड करण्यात आलेले उमेदवार हे अनुक्रमे डी एम एल टी ही अहर्ता संदर्भ क्र 4 नुसार महाराष्ट्र पैरा वैद्यकीय परिषदेने दिलेल्या निकषाप्रमाणे शासनमान्य कोर्स नसताना महाराष्ट्र प्यारा वैद्यक परिषदेचे chapter 1- Section 2, (h)(i), section (26) नुसार ग्राह्य धरण्यात आलेली शिक्षणिक अतिरिक्त अहर्ता ही वरील नियमात बसत नसतानाही
अतिरिक्त शैक्षणिक आरहतेच्या निकषाप्रमाणे पदवी व पदवीका ही अतिरिक्त शैक्षणिक अहर्ता ग्राह्य धरण्यात येऊन निवड यादीमध्ये खुल्या प्रवर्गामध्ये टोकन क्रमांक f 15 व तसेच ईडब्ल्यूएस प्रवर्गातील टोकन क्रमांक I03 हे एकच उमेदवार असताना खुल्या प्रवर्गातील 43.42 % व EWS प्रवर्गामध्ये 49.42 %एकूण गुण देण्यात आले आहे. सदरील उमेदवारानी अनुभव प्रमाणपत्र खोटे सादर केलेले असताना त्याची पडताळणी निवड समितीने न करता अनुभवाचे गुण देण्यात आले असल्याचाही आरोप जहागीरदार यांनी निवेदनाद्वारे केला आहे
खुल्या प्रवर्गातील निवड करण्यात आलेल्या उमेदवारांची अनुभव शासन मान्यता प्राप्त डीएमएलटी कोर्स करण्या अगोदरचा अनुभव, प्रमाणपत्र सादर केले असताना अनुभव प्रमाणपत्राचे गुण चुकीच्या पद्धतीने दिले गेले असून महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग क्रमांक 8 नुसार महाराष्ट्र प्यारा पैरा वैद्यकीय परिषदेची Act 2011 (MAH. ACT.8. Of 2016) मधील chapter No. 9 मधील section 31 (1), (2), (a), (b), (3) नुसार जर कोणी रेजिस्ट्रेशन होण्याअगोदर काम करीत असेल तर ते फौजदारी गुन्हा व अजामीनपात्र अपराध ग्राह्य धरण्यात असे स्पष्ट निर्देश असल्याचेही जहागीरदार यांनी निवेदनात नमूद केले आहे
(संदर्भ क्रमांक 3) मपवैप नोंदणी प्रक्रिया 313 /2023 दिनांक 12 सप्टेंबर 2023 नुसार SRTM युनिव्हर्सिटी मधून PGDMLT उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांकडे तत्सम कौन्सिल चे प्रमाणपत्र नसताना सबंधित उमेदवारांची निवड करण्यात आली.व अंतिम पात्र उमेदवार यादीत संबंधित उमेदवाराकडे नोंदणी प्रमाणपत्र आहे असे दर्शविण्यात आलेले आहे. जे कि नोंदणी संबंधित विद्यापीठ मधून PGDMLT केलेल्या उमेदवा्रांसाठी नोंदणी प्रक्रिया 12 सप्टेंबर 2023 पासून सुरु करण्यात आलेली आहे. आवश्यक ते प्रमाणपत्र नसताना देखील उमेदवारांना पात्र करण्यात आले. असून सदरील पद भरती प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करण्यात आला असल्याच्याही अनेक तक्रारी प्रशासनास प्राप्त झाले असूनअसून यामध्ये मोठे रॅकेट उघडकीस येण्याची दाट शक्यता ना करता येत नसल्याचाही आरोप जहागीरदार यांनी निवेदनाद्वारे केला आहे
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिके कडून दिनांक 04 सप्टेंबर 2023 रोजी दिलेल्या पदभरती जाहिराती नुसार NUHM अंतर्गत निवड करण्यात आलेल्या लॅब टेकनिशीयन (प्रयोगशाळा तंत्रज्ञ) पदाकरिता झालेल्या नियमबाह्य व चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेल्या निवड प्रक्रियेची उच्चस्तरीय चौकशी करून नियमबाह्य रित्या करण्यात आलेली पदभरती तात्काळ रद्द करण्या सह निवड समिती तील अध्यक्ष व सदस्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे व निवड समितीचे अध्यक्ष, निवड समिती तील सर्व सदस्य व ज्या अपात्र उमेदवारां सोबत संगणमत करून त्या उमेदवारांना सदरील पद भरती प्रक्रियेत पात्र करण्यात आले ह्या सर्वावर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा नांदेड च्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा गंभीर इशारा मनसे जिल्हाध्यक्ष मॉन्टी सिंग जहागीरदार यांनी निवेदनाद्वारे दिला आहे यावेळी मनसे शहर अध्यक्ष अब्दुल शफिक मनसे वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष संतोष सुनेवाड मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष दीपक स्वामी मनसे तालुका अध्यक्ष साई जटलवार शंकर पाटील हाडोळीकर चंद्रकांत नागुल संघरत्न जाधव अविनाश वैष्णव राहुल शिंदे आधी मनसे पदाधिकारी उपस्थित होते