संदिप कसालकर

मुंबई, 02 फेब्रुवारी 2025 – देहूरोड पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या चैन स्नॅचिंग प्रकरणातील संशयित आरोपीला मेघवाडी पोलिसांनी अटक करून मोठे यश मिळवले आहे. पोलिस उपनिरीक्षक राठोड यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे, देहूरोड गुन्हा रजिस्टर क्रमांक 32/2025, कलम 309(4) BNS अंतर्गत गुन्ह्यातील आरोपी मेघवाडी, जोगेश्वरी पूर्व परिसरात आढळल्याची माहिती सपोनि वाघ यांना मिळाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, मेघवाडी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संशयित इसमाला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपले नाव संतोष बाबासाहेब धाकरकर (वय 24), रा. अंधेरी पूर्व, मूळगाव केळवे, तालुका भुसावळ, जिल्हा जळगाव असे सांगितले. पुढील सखोल तपासात आरोपीने देहूरोड पोलिस ठाणे हद्दीत चैन स्नॅचिंग केल्याची कबुली दिली.

पोलिसांनी आरोपीकडून चोरीस गेलेली चैन, बॅग तसेच गुन्ह्यात वापरलेली बोलेरो पिकअप (MH 02 FX 4192) हस्तगत केली. आरोपी आणि जप्त मुद्देमाल पुढील कारवाईसाठी देहूरोड पोलिस उपनिरीक्षक राठोड यांच्या ताब्यात देण्यात आले.

कारवाई पथक:
सपोनि वाघ,
पो.ह/03798 माने,
पो.शि/110910 बागुल

मेघवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संभाजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हे यशस्वी ऑपरेशन पार पडले. मेघवाडी पोलिसांच्या तत्परतेमुळे आरोपीला अटक करून न्याय प्रक्रियेची वाट मोकळी करण्यात आली आहे.