नांदेडच्या शासकीय रुग्णालयात पुन्हा एकदा धक्कादायक प्रकार समोर आला आहे… इथे आयसीयू वॉर्डमध्ये एसी बंद असल्याने रुग्णांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे!
सध्या उन्हाचा तीव्र कडाका वाढलेला असताना, नांदेडच्या विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक 30 मधील आयसीयूमध्ये एसी बंद आहे. त्यामुळे रुग्णांचे नातेवाईक रुमालाने हवा करण्यास मजबूर झाले आहेत. रुग्णालय प्रशासनाच्या या हलगर्जीपणामुळे रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
हे रुग्णालय यापूर्वीही अनेक कारणांनी चर्चेत राहिले आहे. काही दिवसांपूर्वीच बालरुग्ण आयसीयू वॉर्डमध्ये झुरळं सापडल्याचा प्रकार समोर आला होता. तर 2023 मध्ये 24 तासांत तब्बल 24 नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना घडली होती. मात्र, एवढ्या गंभीर घटना घडूनही रुग्णालय प्रशासन काहीच धडा शिकायला तयार नाही, असं स्पष्ट दिसत आहे.
आता यावर प्रशासन काय पळवाट काढतं, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे!