प्रतिनिधी: संदिप कसालकर

महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्या प्रचारार्थ काढलेल्या अभूतपूर्व अशा रॅलीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाल्यानंतर जोगेश्वरीकारांमध्ये उत्स्फूर्त वातावरण पाहायला मळले.

विकास कामांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला आपलेसे करून त्यांच्या मनामध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणारे रवींद्र वायकर यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेला रोडशो बघून “ही तर रवींद्र वायकर यांच्या विजयाच्या रॅलीची झलक” असल्याची प्रतिक्रिया जोगेश्वरीकरांच्या तोंडून ऐकायला मिळत होती. या रोड शो मध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही सामील झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारल्याचे चित्र रोड शो मधून दिसून येत होते.

शिवसेना, भाजप, मनसे, राष्ट्रवादी, रिपाई, रासप चे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या रोडशो मध्ये सुमारे ८०० बाईकस्वर आणि ४०० रिक्षा चालक ही सहभागी झाले होते.

उद्योग मंत्री उदय सामंत, अल्पसंख्यांक मंत्री अब्दुल सत्तार, शिवसेना नेते अर्जुन खोतकर, संजय निरुपम आदी वरिष्ठ नेतेही सहभागी झाले होते.मेघवाडी, पासून निघालेला हा रोडशो, पंपाऊस, शेरे पंजाब, बिंद्रा कॉम्प्लेक्स, अंधेरीतील एमआयडीसी मार्गे सुभाष नगर, येथे येऊन समाप्त करण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या सहभागामुळे कार्यकर्त्यांमध्ये एकच जल्लोषाचे वातावरण होते. विविध घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून निघाला होता. कालचा भव्य असा रोडशो बघून ही तर रवींद्र वयकरांच्या विजयाच्या रॅलीची ही झलक असल्याचीच उत्स्फूर्त प्रतिक्रिया रोडशो बघण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा जमा झालेल्या जोगेश्वरीकरांच्या तोंडून बाहेर पडत होत्या.