एस.डी चौगुले

रेहान उर्फ रियाज मकानदार सोलापूर व धाराशीव जिल्हयातून ०२ वर्षाकरीता तडीपार

इसम नामे, रेहान उर्फ रियाज शाहजहान मकानदार, वय-२७ वर्षे, रा. घर क्र. ०४, समाधान नगर, अक्कलकोट रोड, सोलापूर याचेविरुध्द सन २०२२ ते २०२३ या कालावधीमध्ये, सामान्य नागरीकांना दमदाटी करुन त्यांचेकडून जबरदस्तीने पैसे काढून घेणे, नागरीकांना शिवीगाळ, दमदाटी व मारहाण करुन दुखापत करणे यासारखे गुन्हे दाखल असल्याने त्याचेविरुध्द एमआयडीसी पोलीस ठाणेकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ५६ (१) (अ) (ब) अन्वयेचा तडीपार प्रस्ताव पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ), सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता.

सदर प्रस्तावाचे अनुषंगाने श्री विजय कबाडे, पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ), सोलापूर शहर यांनी कार्यवाही करुन, त्यांचेकडील तडीपार आदेश क्र.६८६/२०२४ दि.१५/०३/२०२४ अन्वये, इसम नामे, रेहान उर्फ रियाज शाहजहान मकानदार, वय-२७ वर्षे, रा. घर क्र. ०४, समाधान नगर, अक्कलकोट रोड, सोलापूर यास सोलापूर जिल्हा व धाराशीव जिल्हा येथून दोन वर्षाकरीता दि.१६/०३/२०२४ पासून तडीपार केले आहे. त्यास तडीपार केल्यानंतर होर्ती पोलीस ठाणे, विजयपुर, कर्नाटक येथे सोडण्यात आलेले आहे.

(एन. एस. कानडे) पोउपनि, वाचक अधिकारी, पोउपआ परिमंडळ कार्या. सोलापूर शहर.