अत्याचारपीडीत शाळकरी मुलीने बदनामीच्या भितीने स्वतःचं आयुष्य संपवण्याची मन विषण्ण करणारी घटना संगमनेरनजीकच्या साकूर गावात घडलीय….
साकूर गावात अल्पवयीन मुलीने स्वत:ला संपवल्याचा पोलिस स्टेशनला ADR दाखल झाला…यात पोलिसांनाच काही संशयास्पद वाचल्याने त्यांनी स्युमोटोत तपास सुरू केला व एक एक कडी जोडली परीवाराला विश्वासात घेतले आणि गुन्हा दाखल झाला…
दहावीतल्या मुलीवर स्वत:ला संपवण्याची वेळ आणणाऱ्या हरामखोराला पोलिसांनी अटक केलीच शिवाय त्याला साथ देणाऱ्या तिघांपैकी दोघांच्या मुसक्या आवळल्या असून तिसरा ही लवकरच पकडला जाईल..
गावातील 25/30 जणाचं टोळकं अल्पवयीन शाळेतल्या मुलींना येताजाता छेडण्याचा त्यांच्या मागे लागण्याचा त्यांना त्रास देण्याचे काम करतात….मुली घाबरून काहीच सांगत नाहीत त्यामुळे या हरामखोरांची मजल त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्यापर्यंत पोहोचली ..
या केसमध्ये ही पोलिसांनी @NagarPolice
स्वत:हून लक्ष घातलं नसतं तर कदाचित गुन्हा ही दाखल झाला नसता व कारवाई ही झाली नसती…
शिवाय
या केसमधल्या आरोपीने याआधी ही गावातल्या एका मुलीला त्रास दिलेला तेव्हा पोलिसात न जाता गावातल्या गावात आरोपीकडून लेखा माफीनामा लिहून त्याला सोडून दिले त्यावेळेस पोलिसांना कळवल असतं तर आज एका निष्पाप मुलीला जीव गमवावा लागला नसता हे नक्की…
आम्ही मुलीच्या पालकांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले…लेक गमावल्याच्या दु:खाशी लढण्याचं बळ त्यांना मिळावं अशी ईश्वराकडे प्रार्थना केली..
तसेच,
न्याय मिळवून देण्याच्या लढाईत हर प्रकारच्या आधाराचा शब्द देत तिच्या कुटुंबीयांना माननीय प्रदेशाध्यक्ष @cbawankule जी यांच्या माध्यमातून पक्षातर्फे करण्यात आलेली आर्थिक मदत संगमनेर अध्यक्ष वैभव लांडगेजी तसेच रौफभाई शेख सहदेवजी जाधव यांच्या हस्ते पिडीतेच्या आईच्या हाती सुपुर्द केली…
आज साकुरमधल्या उपस्थित ग्रामस्थ यांना आवाहन ही केलं कि अशा घटनांची माहीती तात्काळ पोलिसांपर्यत द्या असल्या हरामखोरांना पाठीशी घालणं म्हणजे आपल्या पोरीबाळींच्या जीवाशी खेळ आहे…
पोलिस आपल्या संरक्षणासाठी आहेत
सरकार आपल्यासोबत आहे आपल्यासाठी आहे त्यामुळेच न घाबरतां अशा काही घटनांची कुणकुण लागली तर पोलिसात कळवा.
राज्याचे गृहमंत्री @Dev_Fadnavis जी यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून एक ही आरोपी यातून सुटला नाही पाहीजे याबाबतच्या सुचना अहमदनगर पोलिस अधिक्षकांना दिलेल्या आहेत..
जिल्हयाचे पालकमंत्री @RVikhePatil जी यांनी ही आज पिडीतेच्या निवासस्थानी भेट देतं परीवाराचे सात्वंन केले.
मुली व महिलांनीही न घाबरतां त्यांना जर कुणी त्रास देत असेल तर तात्काळ 112 नंबरवर संपर्क साधा…कमीतकमी वेळेत पोलिस तुमच्यामदतीसाठी पोहोचतील…@DGPMaharashtra
दुर्दैवी हे पण आहे की, अशा संवेदनशील घटनेचे सटरफटर लोकांकडून असंवेदनशीलपणे राजकारण  केले जाते…
बुद्धीवरही ‘अंधार’ दाटल्यासारखं बरळणाऱ्या लोकांनी किमान अशा घटनांमध्ये तरी बोलताना बरळण्यापेक्षा तारतम्य बाळगावं…

चित्रा किशोर वाघ
भाजपा,महिला प्रदेशाध्यक्ष