सलाहुद्दीन शेख
भारतीय कामगार सेनेच्या प्रयत्नांना यश, हिंदुस्थान कोका-कोलातील कामगारांना भरघोस पगारवाढ
मुंबई,- भारतीय कामगार सेनेच्या प्रयत्नामुळे वाडा येथील हिंदुस्थान कोका-कोला बेव्हरेजेस लिमिटेड कंपनीतील कामगारांना भरघोस पगारवाढ करण्यात आली आहे. १ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२७ या चार वर्षांकरिता १६,९०२ रुपयांची पगारवाढ मिळणार आहे. त्याचबरोबर कामगारांना विविध लाभही मिळणार आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली, शिवसेना नेते- खासदार आणि भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष अरविंद सावंत, कार्याध्यक्ष अजित साळवी यांच्या सूचनेनुसार व संयुक्त सरचिटणीस संजय कदम यांच्या नेतृत्वाखाली ही पगारवाढ करण्यात आली. त्याचबरोबर कामगारांना व्हेरिएबल डियरनेस अलाऊन्स २३०० रुपये, परफॉर्मन्स लिंक व्हेरिएबल पे ५००० रुपये,प्रॉडक्टिव्हिटी लिंक बोनस स्कीम (वार्षिक) १२,००० रुपये, लाँग सर्विस अवार्ड (वार्षिक) २०,००० रुपये, दिवाळी गिफ्ट कुपन ३५०० रुपये, नवीन गिफ्ट व्हाऊचर पॉलिसीप्रमाणे २७०० रुपयांचे गिफ्ट व्हाऊचर असे विविध लाभही मिळणार आहेत. सदर करारावर व्यवस्थापनातर्फे क्लस्टर एचआर हेड रामचंद्र होनप, फॅक्टरी मॅनेजर योगेश भावसार, फॅक्टरी एचआर मॅनेजर रूपेश परदेशी, एचआर टीम लीडर श्रद्धा शेट्टी, गणेश सिनारे तसेच वाडा युनिट कमिटीचे युनिट अध्यक्ष विवेक पाटील, युनिट सचिव स्वप्नील चौधरी, युनिट उपाध्यक्ष संतोष पाटील, युनिट खजिनदार अविनाश पाटील, युनिट कमिटी सदस्य राहुल वेखंडे, कल्पेश घरत, रूपेश रिकामे यांनी सह्या केल्या. भारतीय कामगार सेनेचे संयुक्त सरचिटणीस दिलीप जाधव, चिटणीस सूर्यकांत पाटील,सहचिटणीस दिनेश पाटील तसेच कार्यकारिणी सदस्य किरण भोईर, ज्ञानेश्वर ठाकरे, योगेश ठाकरे यावेळी उपस्थित होते.